नवीन लेखन...

पाहिजे जातीचे

  पाहिजे जातीचेहिंदी चित्रपट बघून बघून कंटाळा आलाय. सगळे चित्रपट सारखेच, नाविन्य काहीच नाही. त्यात मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत. मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना (महाराष्ट्रात) मागे टाकले आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. पण काही लोकांच्या मते मराठी नाटकांना उतरती कळा

लागली आहे. नवीन नाटके दर्जेदार नसतात असे नाही, परंतु काहीतरी चूकते हे नक्की. बर्‍याचश्या मोठ्या कलाकारांनी रंगभूमीकडे पाठ फिरवली आहे. कारण डेली सोपमधून मिळणारा भक्कम पैसा, असो. पण अशा परिस्थितीतही दिग्दर्शक अनिल गवस यांनी धाडसाचे पाऊल उचलले आहे. विजय तेंडूलकर लिखीत “पाहिजे जातीचे” या नाटकाचे दिग्दर्शन अनिल गवस यांनी केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या नाटकात बरेच नवोदीत कलाकार आहेत. असे गाजलेले नाटक नवीन कलाकारांसोबत करणे म्हणजे आश्चर्यच. विजय तेंडूलकरांच्या लेखनाबद्दल शंकाच नाही. सगळ्या कलाकारांनी आपले काम चोख केले आहे. मंगेश साळवी (महिपती), शोण भोसले (बबन्या) आणि मानसी भागवत (नलीनी) हे प्रमुख भुमिकेत आहेत.
खुसखूशीत विनोदी प्रेम कथा म्हणजे पाहिजे जातीचे. महिपत नावाचा एक तरुण संपूर्ण गावात एकटाच थर्डक्लासने बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण होतो. म्हणून जातीतले लोक त्याचा सत्कार करतात. पण काही केल्या नोकरी मिळत नाही, पूर्वीची नोकरीही जाते. परंतु एक दिवस अचानक महिपतीला दुसर्‍या गावातून नोकरीचा कॉल येतो. त्याला प्राध्यापकाची नोकरी मिळते. पण गावातले मुलं प्रचंड टवाळ असतात. शिकवत असताना महिपतीला ते खूप त्रास देतात. महिपती त्या परिस्थितीतही बाजी मारुन जातो. तिथे त्याचं नलीनीशी (लेक्चररशी) प्रेम जुळतं. पण इथेही मोहब्बत के दुश्म
आहेत. महिपती ह्या सगळ्या प्रस गांना तोंड कसा देतो आणि त्याला नलीनी भेटते कि नाही, ह्याचं उत्तर जर हवं असेल तर “पाहिजे जातीचे” पहायला हवे. अभिनेता मंगेश साळवी यांनी त्यांच्या अभिनयाला चांगला न्याय दिला आहे. शोण भोसले यांचा अभिनय उत्तम आहे. बबन्या या गावंढळ भाईची भुमिका त्यांनी सुंदर हाताळली आहे. बाकी सगळ्या जातीच्या कलकारांनी नाटकाला पूर्ण न्याय दिला आहे. अनिल गवस यांना दिग्दर्शनाची बाजू छान गवसली आहे. नाटकात काही नवीन प्रयोगही केला आहे. उगाच वायफळ हिंदी चित्रपट पाहून पैसे वाया घालवीण्यापेक्षा जातीच्या (जातीच्या म्हणजे रसीक) प्रेक्षकांनी “पाहिजे जातीचे” पाहण्यास हरकत नाही.

लेखक: जयेश मेस्त्री

— जयेश मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..