नवीन लेखन...

पित्त शामक कोजागिरी

आज अश्विन पौर्णिमा,अर्थात्‌ कोजागिरी पौर्णिमा !!सणांचा विचार करताना देखील आपल्या पूर्वजांनी आरोग्याची किती छान काळजी घेतली आहे पहा….शरद ऋतु चालू आहे. निसर्गतःच पित्त वाढण्याचा हा काळ…आटीव दूध आणि शीतल चांदणे या दोन्ही गोष्टी पित्त कमी करणाऱ्या आहेत…याव्यतिरिक्त; मौजमजा आणि गप्पाटप्पा यांमुळेदेखील पित्ताचे शमन होते.सध्याच्या काळात जिथे तिथे stress दिसत असताना याहून अधिक चांगली Stress Buster Therapy काय बरे असेल??? हाच तर आयुर्वेदाचा मोठेपणा आहे!!

असे म्हणतात की या रात्री जागून लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केल्यास वैभव मिळते…अहो; वैभव जरूर मिळेल..पण कोणाला??? जो निरोगी आहे त्यालाच. म्हणून तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही आपण म्हणतो की; “जीवेत् शरदः शतम् |”….शरदच का?? इतर कुठला ऋतु का नाही??? कारण सर्वाधिक रोग शरदातच होतात म्हणुन !! याकरताच आयुर्वेदातील एक वचन प्रसिद्ध आहे- ” वैद्यानां शारदी माता|” शरद ऋतु हा अधिक रुग्ण देणारा असल्याने वैद्यांना आपल्या आईसारखा वाटतो!! अर्थात; यातील मजेचा भाग सोडून द्या! लक्षात ठेवण्याची गोष्ट हीच की; आपण अशा संस्कृतीचा घटक आहोत जिच्यातील प्रत्येक प्रथेमागे काही ना काही अर्थ दडलेला आहे.विनाकारण टाईमपास म्हणून काही करणाऱ्या रिकामटेकड्या लोकांपैकी नाही आपण..त्यामुळेच अभिमान बाळगा या प्रथांचा..फुकट त्यांची नास्तीकवादाने कारणमीमांसा करुन हाती काहीच लागणार नाही..धु म्हटलं की धुवावं म्हणतात; असंच का धुवू आणि पाण्यानेच का धुवू हे वाद केवळ रिकामटेकडेच घालू शकतात…आपण कशाला त्या भानगडीत पडायचं???

गच्चीवर जा ; मस्तपैकी दूध आटवून त्यात छानपैकी केशर वगैरे घालून; आपल्या मित्रपरिवारासोबत गप्पा मारत-मारत त्याचा आस्वाद घ्या!! आरोग्याचे वैभव नक्की प्राप्त होईल.संपत्ती पण त्यालाच मिळेल ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असेल!! आणि पित्त शांत असल्याशिवाय या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत!! सर्वांना कोजागिरीच्या शुभेच्छा!!

वैद्य परीक्षित शेवडे; MD *(Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..