नवीन लेखन...

पी.सी. अलेक्झांडर

पी.सी अलेक्झांडर यांना भारतीय राजकारणात गांधी घराण्याचे विश्वाकसू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म २० मार्च १९२१ रोजी झाला.

संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, जिनेव्हा यांचे सहाय्य महासचिव व कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना, श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून रूजू होण्यास बोलावले. इंदिरा गांधी व त्यानंतर राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून १९८१ ते ८५ या काळात त्यांनी त्या काळातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामांमध्ये निर्णायक भूमिका बजावली.

एक सनदी अधिकारी असलेले डॉ. अलेक्झांडर १९८८ मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. १९९३ ते २००२ असा प्रदीर्घकाळ ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तसेच १९९६ ते १९९८ या काळात त्यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रशी जुळलेले त्यांचे संबंध सर्वाधिक जवळचे राहिले. त्यामुळेच त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. इंदिरा गांधींच्या पंतप्रधानकाळात त्यांचे सचिव म्हणून काम करीत असतांना आलेल्या अनुभवावर इंदिरा : अंतिम पर्व हे डॉ. अलेक्झांडर यांनी लिहिलेले पुस्तकही प्रसिद्ध आहे. डॉ.अलेक्झांडर यांचे १० ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले. डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे स्वांतत्र्योत्तर कालखंडातील विख्यात व आदरणीय लोकसेवकांपैकी एक होते. विख्यात व आदरणीय अशासाठी की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये उच्चप्रतीची कार्यक्षमता, नि:पक्षपातीपणा व सचोटी हे गुण जोपासलेले होते. एक कुशल, मुसद्दी व प्रशासक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक जीवनामध्ये अर्धशतकाहून अधिक काळ विविध प्रकारची उच्च पदे भूषवलेली होती, ते लंडन येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून तीन वर्षे होते, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार येथे सचिव म्हणून तीन वर्षे काम केले, डॉ.अलेक्झांडर यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांच्या दिवसांत वक्तृत्व व वाद-विवाद यांमध्ये आंतरशालेय व आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सातत्याने पहिले बक्षिस जिंकून आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले होते. त्रावणकोर विद्यापीठात शिकत असताना ते त्रावणकोर विद्यापीठ वादविवाद संघाचे प्रमुख होते. आंतर-विद्यापीठ वादविवाद स्पर्धांसाठी इतर विद्यापीठांना भेट देण्याकरिता या संघास पाठविण्यात आले होते. १९४०-४१ मध्ये ते त्रावणकोर विद्यापीठ युनियनचे अध्यक्ष होते. डॉ.अलेक्झांडर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू होण्याअगोदर त्रावणकोर विद्यापीठातून इतिहास व अर्थशास्त्र या विषयांमधील पदव्युत्तर पदवी आणि अण्णामलाई विद्यापीठातून संशोधनाद्वारे एम.लिट. व डी.लिट. या पदव्या संपादन केल्या होत्या. तेव्हाच्या मद्रास व त्रावणकोर-कोचीन राज्यांतील जिल्ह्यांमध्ये काम केल्यानंतर ते १९५५ मध्ये केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर दाखल झाले. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय अधिकारी संकोषासाठी निवड झाली तेथपासून त्यांच्या नियत सेवावधीपर्यंत ते भारत सरकारच्या सेवेत विविध हुद्यांवर काम करत राहिले. डॉ.अलेक्झांडर यांनी नूफिल्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत युनायटेड किंग्डम व्यापार मंडळ येथे प्रशिक्षण घेतले होते आणि फोर्ड फाऊंडेशन फेलोशिपअंतर्गत कॅलिफोर्नीया यु.एस.ए. येथील स्टॅनफोर्ड संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले होते. डॉ.अलेक्झांडर यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये, राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर भाष्य करणारा ईश्वरी देणगी असलेला व विद्वान वक्ता म्हणून आपल्या श्रोतृसमाजाची स्तुती व प्रशंसा लाभली. त्यांना १९९९ मध्ये प्रतिष्ठित अशा लोक प्रशासनामधील अग्रगण्य कांची परमाचार्य राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. डॉ. अलेक्झांडर हे जगभर पसरलेल्या भारतीय विद्याभवनच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे एक दशकाहून अधिक काळ सदस्य राहिलेले होते. ते जून १९८९ पासून केंब्रिज विद्यापीठाच्या नेहरू न्यासाचे अध्यक्ष होते.

पी.सी.अलेक्झांडर यांचे १० ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..