माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.
माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.
त्यांचे म्हणणे होते की हरबरा डाळीने गॅसेस होत नाहीत तर बाहेर पडतात. आणि आपले पूर्वज काय वेडे होते काय ज्यांनी दिवाळी सोडून इतर सर्व सणांना पुरणपोळी करायची पद्धत पाडली?
मुद्दा विचार करायला लावणारा होता.
मी ठरविले १५ दिवस नाही ७ दिवस करून तर बघू. आपल्याला दमा नाही का इतर त्रास ही नाहीत बघूया काय होते ते. दि. २६ जुलै २०१६ पासून मी पुरणपोळीचा उपवास सुरु केला.
माझे बघून माझ्या पत्नीनेही सुरु केला. तीची कंबर दुखत होती फार वेळ बसवत नव्हते. झोपावे लागत होते.
नाष्ट्या पासून रात्री झोपे पर्यत जे काही खायचे ते फक्त पुरणपोळीच.
पहिले दोन दिवस बरेच गॅसेस सुटले. नंतर थोडे अँसिडीक वाटले म्हणून बाबांशी बोललो. ते म्हणाले काकडी खा. म्हणून दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण झाले की काकडी खायला सुरवात केली. आणि काय गम्मत अँसिडीटी ही नाही आणि गॅसेस ही सुटेनसे झाले.
दर तीन ते चार तासांनी सडकून भूक लागायला लागली. शरीर मागणीच करत होते.
दुसर्याच दिवसापासून शरीर अतिशय हलके वाटायला लागले. पोट साफ व्हायला लागले. भूक वाढली. एनर्जी वाढली. रात्री पर्यत फ्रेश रहायला लागलो. खाल्लेले सगळे पचून जाते असे जाणवायला लागले.
४ थ्या दिवशी मात्र गोडाचा कंटाळा येऊ लागला. पण शरीर इतके हलके वाटत होते की उपवास सोडायची काही इच्छा होत नव्हती.
मला गोड पुरणपोळी खायचा कंटाळा आला होता, इतर पदार्थ खावेसे वाटू लागले होते. पण मन मारले. आपण स्वतः वर प्रयोग करत आहोत तर तो पूर्ण करायलाच पाहिजे. पेशंट असतो आणि एखाद्या वैद्याने सांगितले असते तर मध्येच सोडून चालले असते का? आणि सोडले तर गुण आला नसता तर दोष कोणाचा? माझा की वैद्याचा? अजून तीन दिवसच आहेत करू पूर्ण काय होतंय त्यात.
तिकडे बायाकोने पण पुरणपोळीचा उपवास सुरु केला होता. पण तिचा निग्रह कमी पडला. तिने तिसर्याच दिवशी रात्रीचे जेवण सुरु केले पण ते म्हणजे ज्वारी व डाळीचे पीठ एकत्र करून त्याचे थालीपीठ करून खाऊ लागली . पण तो पर्यत तिलाही फायदा झाला. तीला सहसा गॅसेस सुटत नाहीत. पण तिलाही प्रचंड गॅसेस सुटले. तिची कंबर दुखी ९०% कमी झाली. ती दोनच दिवसांत चार पाच तास बसू लागली. पाच दिवसांनी विचारले तर कंबरदुखी पूर्ण पणे थांबली होती.
भूषण जोशी
व्दारा वैद्य अरविंद जोशी,
६१५ नारायण पेठ नवश्रीमान सोसायटी लोखंडे तालीम जवळ पुणे ३०
सोमवार, गुरुवार, शनी वारी संध्याकाळी ४ ते ६
Leave a Reply