नवीन लेखन...

पुराणकाळातील अस्त्र

महाभारतातल्या महायुद्धाच्या कथा ऐकल्या. कौरव व पांडव ह्या दोन भावंडामध्ये झाल्या होत्या. ह्या अंगावर रोमांच उभे करतात. जर सुक्ष्म निरक्षण केले तर ते शस्त्र व अस्त्र यांचा उपयोग करुन लढले गेलेले युद्ध होते.

थोड्याच लोकाबद्दल योध्याबद्दल विरा बद्दल त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नावे सांगीतली गेली. त्यांची रणांगणातील यश वा अपयश प्राप्त म्हणून ओळखली गेली. परंतु ह्या युद्धांत अनेक अनेक विर पराक्रमी लढवये लढले. बलीदान पावले. त्यांची नांवे आपणासाठी तरी अंधारतच राहीली. फक्त श्री कृष्णला त्या प्रत्येकाबद्दल ज्ञान होते. जाणीव होती. केवळ त्या युद्धांत श्री कृष्णाची प्रत्यक्ष असण्याची भूमिका असल्यामुळे, जे तेथे त्याच्या नजरेदेखत धारातिर्थी पडले, त्यांच्याही आत्म्याना सद् गती मिळाली असावी, हे समजणे चुक ठरणार नाही.

आगदी अधूनिक पद्धती प्रमाणे त्या युद्धांत डावपेच खेळले गेले. प्रतीस्पर्ध्यातील नैपुण्य, योग्यता, अचुकपणा, शस्त्रांचा वापर, अस्त्रांचा मारा, इत्यादींचा अभ्यासपूर्वक विचार होत होता. शस्त्र म्हणजे धनुष्य बाण, गदा, तिरकमटा, भाला, तलवारीसारखे हत्यार, इत्यादी आयुधे होती. ही साधी परंतु धारदार शस्त्रे होती. पूर्वी आश्रम आणि गुरुकडून ज्ञानसाधना होत असे. त्यांत मंत्रविद्या शिकवली जाई. मंत्रशक्ती प्रभावाने निरनीराळ्या उर्जाशक्तीना आवाहन करुन आपल्या जवळच्या शस्त्रामध्येच त्या अवतरीत केल्या जात. त्याचा त्याप्रमाणे परिणाम होत असे. उदा. बाणावर अग्नीचा मंत्र म्हणून, दिव्य अग्नीअस्त्र निर्माण केले जाई. परिणाम स्वरुप अग्नीचा वनवा वा ज्वालांचा हा हा कार होत असे. त्याच वेळी त्या अग्नीच्या वनव्याचा प्रतीकार पर्जन्यास्त्र वा पवनास्त्र ह्या संकल्पनेने केला जाई. जेवढे महान गुरुज्ञान व तपस्वीता, पावित्र्य थोर, तेवढी मंत्र साधना व तपोबल श्रेष्ठ असे. अस्त्रयुद्धाचे महत्व येथेच ठरते.

दोन अत्यंत महत्वाची अस्त्रे महाभारत युद्धात वापरली गेली. एक ब्रह्मास्त्र व दुसरे नारायणास्त्र. दोन्हीही प्रचंड शक्तीची विध्वंसक. परंतु केवळ श्री कृष्णाच्या दिव्य भव्य ज्ञानशक्ती, चातूर्य, व दूरद्दष्टीमुळे त्या दोन्हीही अस्त्राना निकामी केले गेले. त्यांच्या प्रचंड विध्वंसक शक्तीवर रोक लावला गेला. तेही फारसे कांहीही न करता साध्य केले गेले. हा विषयाचा वृतांत उद् भोदक ठरेल. करमणूक करणारा वाटेल.

ब्रह्मास्त्र हे नांव उचारताच प्रत्येकजण हादरुन जातो. घाबरतो. बेचैन होतो. जसे अधूनिक काळातील अँटम बॉंब ( Atom Bomb ). ह्याची सर्वाना कल्पना आहे. १९४६ साली अमेरीकेने त्याचा प्रथम वापर केला. तो जपानच्या हिरोशीमा व नागासाकी ह्या भागांवर.केवळ एका शस्त्राने प्रचंड भयानक व कल्पनेच्या बाहेर हानी पोहंचवीली. निसर्गात एक उत्पात माजला. घरदारे, मानवप्राणी, अनेक जीवजंतू, ह्याचा क्षणांत नाश झाला. विचार करता येणार नाही, असा हाहा कार त्या शस्त्राने केला. जमीनीचे अपरीमीत नुकसान झाले. झाडे झुडपे यांची वाढ  बराच काळ खुरटली. जमिनीचा सुपीकपणा नष्ट झाला. अनेक लहान मोठे प्राणी नामशेष झाले. केवढा हा भयावह परीणाम. त्या एका अधुनिक शस्त्राचा.

” ब्रह्मास्त्र “ हे आगदी ह्याच पद्धतीप्रमाणे होते. मात्र ते अस्त्र होते व त्याची विध्वंसक क्षमता आजकालच्या कोणत्याही बॉंबपेक्षा अनेक पटीने जास्त होती. ब्रह्मास्त्राची योजना व त्यावरील ताबा एकदम वैयक्तीक होता. त्याचा आधार पवित्रता, एकाग्रता, ज्ञान, असा उच्य दर्जाच्या साधनेमध्ये होता. माणसाची योग्यता जर इतक्या वरच्या स्थरावर साध्य झाली, तरच त्याला ब्रह्मास्त्र शिकण्याचा व बाळगण्याचा हक्क अपोआप मिळे. त्यामुळे ते अस्त्र कुणीही घेईल वा वापरेल हे मुळीच नव्हते. आजकालचे Atom Bomb, Hydrogen Bomb,  अटॉमिक शस्त्र हे कुणालाही ज्ञान घेऊन, चोरुन, लुबाडून, अर्थसहाय्य देऊन, सहज प्राप्त होऊ शकते. तसेच ह्याचा कुणीही उपयोग करु शकतो. आगदी माथेफीरु, बदमाश, वा आतंकवादी. ते जे असेल ते कुणालाही मिळणे अशक्य नाही. ब्रह्मास्त्राचे असे मुळीच नव्हते. त्याचमुळे योग्यताप्राप्त अशी मोजकी व्यक्तीरेखा होऊन गेल्या की ज्याना ब्रह्मास्त्राचे ज्ञान व उपयोग करण्याची क्षमता प्राप्त झाली होती. केवळ मंत्र तंत्र पाठ करुन हे शक्य नव्हते. त्यासाठीची  बैठक ही महानता, दिव्यता, भव्यता अंगी असल्याशिवाय शक्यच नव्हते.

ब्रह्मास्त्राला आणखी एक गुणधर्म होता. ब्रह्मास्त्राच्या विध्वंसक परिणामाना जर रोकणे जरुरी असेल तर, त्यावर फक्त एकच उपाय होता. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रानेच विरोध करणे. येथे अस्त्राची योजना अशी होती की टाकल्या गेलेल्या ब्रह्मास्त्रावर जर विरोधी दिशेने कुणी फक्त ब्रह्मास्त्रच फेकले तर दोन्ही अस्त्र आपसांत एक होऊन, कोणताही उत्पात न करता निकामी होऊन जात. विचार केल्यास ही अप्रतीम योजना होती. त्या काळी दिव्य उर्जा असलेली  अस्त्रे होती. त्याचप्रमाणे त्याना निकामी करण्याचे ज्ञान अस्तित्वात होते. ही अत्यंत भाग्याची देण म्हणावी लागेल. समोरा समोरचा विर लढवय्या दोन्ही प्रकारचे  ज्ञान बाळगुन होता. तो दिव्य अस्त्र टाकणे  अथवा विरुद्ध दिशेने स्वतः वर टाकलेले अस्त्राला निकामी करणे. ज्याना हे ज्ञान अवगत नव्हते, तेच त्या अस्त्राचे बळी पडत. मात्र त्यासाठी गरज होती ती त्या अस्त्राची जाण व धारणा असलेल्या व्यक्तीची.

कौरव आणि पांडव यांच्या युद्धांत ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु त्याच वेळी दोन्ही पक्षातील कांही महान व्यक्तीना त्याचे ज्ञान अवगत असल्यामुळे, ब्रह्मास्त्राला निकामी करणेही शक्य झाले. कौरवाना स्वतःला ब्रह्मास्त्राचे ज्ञान मुळीच नव्हते. कारण तेथे संबंध होता पावित्र्याचा, एकाग्रतेचा. मात्र त्यांच्याबरोबर होते भिष्माचार्य, द्रोणाचार्य, ज्याना ब्रह्मास्त्र विद्या अवगत होती. अर्जून. कर्ण यानाही हे ज्ञात होते. कौरवाकडून प्रथम ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु सतर्क असलेल्या पांडवाना श्रीकृष्णाने त्वरीत मार्गदर्शन केले. दोन्हीकडील ब्रह्मास्त्रामुळे कसलाही विध्वंस वा हानी न होता ती नामशेष केली गेली.

दुसरे अस्त्र ” नारायणास्त्र ” . ह्या अस्त्राची तिवृता व विध्वंसक क्षमता ही देखील प्रचंड होती. कदाचित् ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त असेल. कौरवांच्या सुदैवाने त्या अस्त्राचे ज्ञान फक्त भिष्माचार्यानाच होते. पांडवाकडील कुणालाही नारायणास्त्राचे ज्ञान नव्हते. अर्थात श्री कृष्णाला ते संपूर्णपणे माहीत होते. आणि तो पांडवांच्या बाजूने होता. परंतु पांडवांच्या दु्र्दैवाने श्री कृष्णाची युद्धपूर्व अट त्यानाच जाचक ठरणारी होती.

“मी युद्धांत तुम्हास साथ देईन. चार शब्द युक्तीचे सांगेन.

परंतु हाती शस्त्र वा अस्त्र केंव्हांही घेणार नाही. ”

शेवटी झालेही तसेच. जेव्हां कौरवानी बघीतले की ब्रह्मास्त्र हे निकामी झाले, त्याक्षणी दुर्योधनाने पितामह भिष्माचार्य याना विनंती केली की त्यांनी शेवटचा उपाय म्हणून

“श्री नारायणास्त्र  ” याचा वापर  करावा.   भिष्माचार्यानी ते मंत्रुन पांडव सेनेवर टकले.

काय घडले असते ? कारण प्रचंड विध्वंसक व हानीकारक क्षमताप्राप्त  ते अस्त्र होते. हा हा कार माजला असता. पांडवाकडे तशाप्रकारचे अस्त्र नव्हते. ह्याच ठिकाणी, ह्याच क्षणी उपयोग झाला तो श्री कृष्णाच्या युक्तीच्या चार गोष्टींचा.

न घरी शस्त्र करी मी   /     सांगेन गोष्टी युक्तीच्या चार    //

“श्री नारायणास्त्र  ” ह्याचे संपूर्ण ज्ञान फक्त श्री कृष्णाला अवगत होते. त्याच्या विध्वंसक क्षमतेची त्याला कल्पना होती. त्याच प्रमाणे त्या अस्त्राचा एक विशेष गुणधर्म होता.

”  जो त्या अस्त्राला विरोध करेल, त्याच क्षणी त्या विरोधामधली सर्व उर्जा शक्ती आपोआप नारायणास्त्र खेचून घेईल. नारायणास्त्राची आपली उर्जा व विरोधकाची उर्जा एकत्र होऊन ते नारायणास्त्र जमा झालेल्या शक्तीनीशी विरोधकाचा नाश करेल.

श्री कृष्णनी येणाऱ्या नारायणास्त्र याचा वेध घेतला. त्याच क्षणी त्यानी अर्जूनाला आणि इतर सर्व सेनेला सुचना केली की सर्वानी त्या नारायणास्त्राला नतमस्तक व्हावे. आपली हत्यारे टाकून द्यावी. कोणताही विरोध वा उलट हल्ला करु नये. सर्वानी त्याक्षणी ते मानले. कुणीही त्या नारायणास्त्राला कसलाही विरोध केला नाही.  “विरोधकांची उर्जा शक्ती हानन ”  हीच जर नारायणास्त्राची संकल्पना होती. तर त्याला कोताही विरोध न करता, It was  Total Surrender to Narayanastra करीत त्याला मान्यता व अभिनादन केले गेले. ज्या तेजाने नारायणास्त्र चालून आले ते सर्व पांडव सैनाच्या वरुन कसलाही आघात न करता निघून गेले. नामशेष झाले. जणू ह्या अस्त्राने श्री कृष्णालाच एक प्रकारे अभिनादन केले होते.

अशा तऱ्हेने दोन दिव्य, भव्य प्रचंड उर्जायुक्त, विध्वंसक अस्त्रे ही नामशेष केली गेली. योग्य त्या धोरणामुळे व श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळे.

पशुपतास्त्र-  हे प्रचंड ताक्तीचे अस्त्र श्री शंकराच्या संबंधीत असते. ते शिवानी प्रसन्न होऊन अर्जूनाला दिले होते. परंतु त्या अस्त्राचा कुणाही व केव्हांही उपयोग केल्याची नोंद नाही. ते अत्यंत विनाशी अस्त्र असून त्याची विध्वंसक शक्ती ब्रह्मास्त्र, नाराणास्त्र यांच्या पेक्षाही जास्त असते. संपुर्ण जग, त्यातील सर्व जीवन उद्धवस्त करण्याची श्रमता ह्या अस्त्रांमध्ये असल्याची नोंद पुराण शास्त्रांत केलेली आहे. ते जर वापरले, टाकले तर जो विनाश घडेल त्यांत टाकणाऱ्यासहीत सर्वांचा नाश करण्याची शक्ती त्याच्या अंगी असते. म्हणूनच अर्जूनाने देखील ते अस्त्र कधीच वापरले नाही. श्री कृष्णाचा हे अस्त्र वापरण्याला विरोध होता.

आंता काळ बदलला आहे. पूर्वीचा इतिहास पुराण हे सर्व दाखविते व वर्णन करते. की भारतीयांजवळ ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पशुपतास्त्र ही प्रचंड विनाश क्षमता असलेली अस्त्रे होती. आजच्या अधूनिक काळांत त्याच धरतीची अस्त्रे आपण बाळगीत आहोत. ज्याला ऍटम (अणू) बॉंब, नॉट्रोजन बॉंब, हैड्ऱोजन बॉंब इत्यादी संबोघीले गेले. हे  आपण समजतो, अभ्यासतो. जे सारे एके काळी पूर्वीच आपणाजवळ होते. मानवाचा पूर्व इतिहास तेवढाच मनोरंजक, बोधक आणि थरार निर्माण करणारा होता. प्रत्येकानी त्याला सन्मान द्यावयास हवे. आदर करावयास हवे. आपल्या ऋषीमुनिंची शक्ती, क्षमता अभ्यासूनच आजच्या अधूनिक इतिहासांत त्याची पुनुरावृत्ती होताना दिसते. त्या ऋषीमुनीना विनंम्र प्रणाम.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..