स्त्रियांवर होणार्या बलात्कारास
कारण स्त्रियांचे तोकडे कपडे
हल्ली पुरुष सहज म्हणून जातो …
स्त्रियांचा प्रती त्याच्या नजरेत
असणार्या प्रेम वजा वासनेला
पुरुष सहजच नजरेआड करतो ….
आपल्या पुरुषत्वाची ताकद
जगाच्या कल्याणासाठी आजमावयाची
तर पुरुष ती हल्ली स्त्रियांवर आजमावतो …
कळत नाही आजही पुरुष
स्त्रियांना आपल्या ताटाखालचं
मांजर का समजतो ….
स्त्रियांनी कसं राहावं , कसं वागावं
कसं बोलावं , कसं चालावं हे
पुरुष ठरवूच कसा पाहतो…
स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती आहे
स्वतंत्र विचाराची हे पुरुष
आजही स्विकारणं का टाळतो …
पुरुषातील हिंस्र पुरुषच स्त्रियांवर
बलात्कार करतो पण याचा दोषी
मात्र त्यांच्या पोशाखाला धरतो …
पुरुष स्वतःचा पुरुषी अहंकार गोंजारत
स्त्रियांवर होणार्या अन्यायाला त्यांनाच
जबाबदार ठरवून नेहमीच मोकळा होतो …
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply