रस्त्याने चालताना तिच्या मागून
ती वार्याची झुळूक होऊन
माझ्या मेंदूत शिरताच
मला तिच्या सौंदर्याची नशा चढून
मी ढकलायला लागताच
मला एक पुरुष सावरतो
पुरुषी अहंकार नाव असलेला…
मग शोधू लागतो
माझ्यातील पुरूष
तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा
आणि तिच्या कपडयांवर
जागोजागी पडलेल्या छिद्रांना
ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण
त्याला ह्वे तसे,
मी तिला कधीच विचारत नाही
त्या छिद्रांबद्दल
कारण मला माहीत असतं
ती छिद्रे माझ्यामुळेच झालेली आहेत…
कधी – कधी मी माझ्या जीवनातील
तीच अस्तित्वच नाकारून मोकळा होतो
मग ती वादळ झाली तरी
माझ्या मनालाही स्पर्श करीत नाही
आणि मला माझ्या पुरुषत्वाची
परीक्षा ही द्यावी लागत नाही…
— कवी – निलेश बामणे
Leave a Reply