बाईला वाटतं माहेर म्हणजे मायेचं मोहोळ, आईची ओढ, जिवाचा विसावा. ही स्त्री गावातली असो वा शहरातली. शिकलेली, बिनशिकलेली, गृहिणी, नोकरदार, तरुणी किवा प्रौढा. माहेरची आंतरिक ओढ तिला असतेच गेल्या शंभराहून अधिक वर्षांत मराठी स्त्रीनं विविध क्षेत्रांत उंच झेप घेतलेली आहे. शिक्षण, स्वातंत्र्य, समता, व्यवसाय, नोकरी अनेक बाबतीत स्त्री-पुरुष तुलनेत ती कमी पडत नाही. मग माहेरची ओढ वाटणं ही तिची दुर्बलता आहे का? पुरुषांची बरोबरी करताना त्या भाबड्या भावविश्वातून तिनं बाहेर पडावं का? ज्या सांसारिक, आर्थिक, व्यवसायविषयक अडचणीतून स्त्री जाते त्यातूनच पुरुषही जात असतो. माणूस या न्यायानं त्याला रत्त*ाची नाती, माया, प्रेम, विसावा वगैरे कोण देणार? अशा वेळी, विचार येतो- पुरुषांना हवं असतं का माहेर?
यासाठी मग माहेर या शब्दातला ‘भावनिक’ भाग गाळून ‘वस्तुनिष्ठ’पणे या कल्पनेची सद्य:कालामधील व्याख्या करावी लागेल.
‘माहेर’ म्हणजे लहान वयात डोक्यावर आलेली मोठी जबाबदारी निभावताना मनावर येणारं दडपण, ताणतणाव दूर करण्याचं साधन.
जबाबदारी आणि कर्तव्यातून दूर होऊन बदल आणि विसावा मिळण्याचे ठिकाण.
आपली सुखं, दु:खं कुणाबरोबर वाटून घेण्याची जागा.
आठवणीत रमण्याचं ठिकाण.
Blood is thicker than water हे जाणवून पुन्हा नव्या जोमानं कामाकडे वळण्याची प्रेरणा.
आपलं स्वत:चं अस्तित्व, आपलं घरकुल, कमाई, सुरक्षितता हे अबाधित राखून चार दिवस स्वत:मध्ये हरवून जाण्याची संधी.
पाळणाघर, वृद्धाश्रम याप्रमाणे ‘माहेर’ देणारी संस्था.
वरील व्याख्या नीट तपासून पाहिल्या तर त्या आजच्या स्त्री आणि पुरुषाला सारख्याच लागू पडताना दिसतात. पण ‘पुरुषांना हवं असतं का माहेर?’ असा प्रश्न विचारला, तर बहुतेक पुरुष नुसतंच नकारार्थी उत्तर देतील असं नाही तर हा प्रश्न साफ झटकून टाकतील. असा ‘बायकी’ प्रश्न, विचारल्यामुळे त्यांचा पुरुषी अहंकार दुखावेल. ‘आमचे प्रश्न आमचे ताणतणाव निभावायला आम्ही समर्थ आहोत, आम्हाला नको ते माहेरपणाचं लचांड!’ असं काहीबाही म्हणत राहतील.
असं म्हणण्यापूर्वी त्यांनी खरं तर ‘माहेर’ ही संकल्पना, त्याची नवी व्याख्या स्वत:च्या बाबतीत प्रामाणिकपणे लागू करून पाहावी.
लहान वयात मोठी जबाबदारी, म्हणजे अगदी ‘भरली घागर’च कशाला हवी? मोठ्या कंपन्यातले तज्ज्ञ हुद्देदार, सी.ए., कंपनी सेक्रेटरी, मॅनेजर्स अशा अनेक हुद्यांवर तिशीतले तरुण दिसतात. वयाच्या मानानं ही जबाबदारी मोठी नसते?
अनेक तरुण मल्टिनॅशनल कंपनीत आय.टी.मध्ये मोठ्या पदावर आहेत. दर महिना- दोन महिन्यानं कंपनी त्याला अमेरिकेला पाठवते. लठ्ठ पगार, गाडी, इतर खूप पकर्स आहेत… पण त्यातल्या कुणाला ब्लडप्रेशरनं गाठलं आहे. कुणाच्या डोक्यावरच्या विरळ केसात पांढरी लाट उमटली आहे. व्यायाम, गाणं, खाणं यासाठी इच्छा असूनही वेळ देता येत नाहीय.
अशा पुरुषांना असावं ना माहेर?
खासगी किवा सरकारी नोकरीत किवा डॉक्टर असो की वकील, त्या पुरुषांवर व्यवसायाची नीती आणि गुप्ततेची काही बंधनं असतात. न्यायसंस्थेत काम करणाऱ्या उच्च पदावरील पुरुषांना समाजात मिसळणं, जाहीर बोलणं या गोष्टींवरही मर्यादा पडतात.
रजनीताईंचे पती अशाच मोठ्या सरकारी पदावर काम करून 35 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. तोवर त्या माणसाच्या स्वभावात, व्यत्ति*मत्त्वात आमूलाग्र फरक पडलेला होता. कॉलेजात कविता करणारे, मित्रमंडळीत जोक्स सांगून खसखस पिकवणारे सुधाकर नुकतेच मितभाषी नव्हे, तर जवळजवळ मौनीच झाले. घरात कुणाशी कसा संवाद साधावा, बाहेर कुणाशी कोणत्या विषयावर बोलावे किवा बोलू नये अशा संभ्रमात ते वावरत. हा कोंडलेपणा, हा मुकेपणा येण्यापूर्वी त्यांना वाट सापडायला हवी होती, माहेराची.
तरुणपणाची चाहूल लागली आणि कॉलेजच्या कॉरिडोरमध्ये पाऊल टाकलं की पुरुषांचा ‘झोका’ इंदिरा संतांच्या कवितेप्रमाणे उंच उंच चढत जातो.
‘उंच उंच माझा झोका, झोका भिडतो आभाळाला
गुंजे एवढे माझे घर, त्याची ओळख आठवेना’ अशी स्थिती होते.
घर, त्यातली माणसं, त्यांचा सहवास, सुख-दु:खं यांपासून तो विविध कारणानं दूर दूर जात राहतो. राहिले दूर घर माझे… असे म्हणत असताना जेव्हा वाटू लागते. ‘पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ त्यावेळी मागे वळून पाहतो, तेव्हा काय दिसतं? ‘किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई!’
नाती ही जन्मानं निर्माण होत असली तरी त्याला सहवासाचं खतपाणी घालावं लागतं. संवादातून संजीवनी द्यावी लागते तरच त्यातला ओलावा टिकून राहतो. नाहीतर त्याच्या अभावी जवळची नाती ही शुअसा माणूस कुटुंबातला असूनही उपरा, परका वाटतो. उमेश आजारी पडला तेव्हा त्याची बहीण मीना मुद्दाम त्याला भेटायला दोन दिवस आली. पण पुढे काय… प्रौढ वयात कुठलं सासर अन् कुठलं माहेर, म्हणून जवळपास 10 वर्षात उमेश आणि मीनाची स्वस्थ भेट झालेली नाही. लग्नकार्यात कुठे उभ्या उभ्या भेट झाली तेवढीच. उमेशच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर पुढे दोन दिवस त्याच्या उशाशी बसलेल्या मीनाशी काय बोलावं हे उमेशला उमगत नव्हतं. यापेक्षा ऑफिसमधल्या एखाद्या डिसूजा किवा पै शी तो अधिक बोलू शकत होता. का निर्माण होते ही दरी? माहेराकडे मागे वळून न पाहिल्यामुळे?
स्त्री माहेर सोडून सासरी येते. अजूनही काही ठिकाणी तिला जाच, सासुरवास होतो. तरीही ती सासरचे नातेसंबंध सांभाळते. पुरुष तर स्वत:च्याच घरात आपल्या माणसात असतो. तो जपतो का हे संबंध? वेगळं कुटुंब झालं तरी स्त्रीला माहेरची ओढ असते. पुरुष किती मायेनं आई, वडील, भाऊ, बहीण, भावजय यांच्यासाठी आपल्या मायघरी येतो?
खरं तर या ओलाव्यामुळेच स्त्री नोकरी, घर, मुलं, सासर, माहेर, सण, व्रतवैकल्य, सौंदर्य थृष्टी या अनेक गोष्टींत रस घेऊ शकते. माहेराकडून अपेक्षा, ती जुनी कल्पना पुयाप्रमाणे पुरुषांनी देखील स्वत:ची प्रतिमा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. स्त्री ही आता डोळे उघडून त्याच्यात दडलेल्या माणसाचा शोध, वेध घेते आहे.
‘कसा दिसतो हा पुरुष?
शिकारी, जुल्मी, स्वामी, श्रेष्ठीच का फत्त*?
आता…
लख्ख प्रकाशाला सरावले आहे तिचे डोळे
तेव्हा दिसतो तिला त्यामागचा
गुंतागुंतीचा पुरुषही!
दबलेला, अगतिक, हताश, हळवा,
स्वप्नाळू आणि गमत्या देखील!
आता घेऊ देणार नाही ती तुम्हाला
सुधारकाची पोज.
मर्दानगीचा तुझा मुखवटा
उसवते आहे ती
आपल्या हातातल्या सुईनं.’
(एका लेखिकेच्या ‘पुरुष कथा’ संग्रहाची वरील प्रस्तावना इथे आठवते.)
हजारो वर्षांपूर्वी या देशात होती मातृसत्ताक पद्धती. कुटुंबप्रमुख स्त्री आणि घरात तिचे सर्व नातेसंबंधी. तेव्हा सासरी नांदणाऱ्या पुरुषांची अवस्था कशी होती याबद्दल कुणी फारसं लिहिलेलं नाही. पण आता त्याची गरजही नाही. उलट आता माहेर सोडून सासरी किवा स्वगृही राहणाऱ्या स्त्रीलाही ‘माहेर’ या संकल्पनेच्या मर्यादा जाणवतात.
वडिलोपार्जित इस्टेटीचा वारसदार होण्याचा हक्क ती न ओशाळता स्वीकारते. सणवार, बाळंतपण यासाठी माहेराची वाट धरण्यापेक्षा इतर सोय करता येते, हे तिला पटतं. माहेरी निवृत्त झालेली आई आणि नोकरी करणारी भावजय हे ‘वातावरण’ तिला फार काळ सुखवत नाही. म्हणूनच स्त्री काय किवा पुरुष काय त्यांनी ‘माहेर’ ही सामायिक सुखसोयींची बेटं निर्माण करायला हवी. आम्हाला हवंय कशाला माहेर? हा इगो प्रॉब्लेम करू नये. फारच बोचत असेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा.
यासाठी असावं ना पुरुषांना माहेर?
Leave a Reply