नवीन लेखन...

पोटदुखीची कारणे

पोटदुखीची आणखी काही कारणे आहेत. स्टमक फ्लू किंवा विषाणूद्वारे होणारे पोटातील संक्रमण, अन्नातून विषबाधा होणे, कृमी होणे, अॅ सिडिटी, टायफॉईड, कावीळ या आजारांमध्ये पोटदुखी होते. ही कारणे केवळ उदाहरणासाठी आहेत. यामध्ये पोटदुखीची सर्वच कारणे समाविष्ट नाहीत. पित्ताशयातील खडे, किडनी स्टोन, रक्त वाहिन्यामधील अडथळा निर्माण होणे, गाठ होणे किंवा अन्य कारणांमुळे सुद्धा पोटदुखी होऊ शकते.

लक्षणे
पोटात मुरडा येऊन वेदना होणे, पोट फुगणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणे, उलटी होणे, मळाद्वारे आव किंवा रक्त पडणे अशा स्थितीत पोट दुखत असल्यास, वारंवार उलट्या होत असल्यास, पोटाला स्पर्श करताच तीव्र वेदना होत असल्यास किंवा श्वारस घेण्यास त्रास होत असल्यास तसेच पोट साफ होण्यास अडचण येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.

उपचार
पोटदुखीवर उपचार हा त्यामागची कारणे आणि लक्षणांच्या आधारावर केला जातो. साधारणपणे अपचनासाठी अॅचन्टासिड किंवा गॅस दूर होण्याची औषधे दिली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याने कृमी नष्ट करण्याचे औषध घेता येऊ शकते. हलका आहार ठेवावा, पुरेशा प्रमाणात पातळ पदार्थ घ्यावेत, परिस्थिती नियंत्रणात नसल्यास रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जावे आणि उपचार करावा.

पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी काही सामान्य नियम पाळता येऊ शकतात. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ आहार याकडे लक्ष द्यावे. फळांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. तळलेले, मसालेदार पदार्थ कमी खावेत. नियमित अंतराने आणि कमी प्रमाणात आहार घ्यावा. खाण्यापूर्वी आणि शौचालयातून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. याचे कारण म्हणजे पोटातील संक्रमणाची बरीचशी कारणे असू शकतात. अस्वच्छ अन्न खाणे किंवा पाणी पिणे, अस्वच्छ हातांद्वारे शरीरात जंतूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वारंवार जुलाब होणे, अशक्तपणा वाटणे, उलटी होणे, काही वेळेला ताप येणे अशी लक्षणे दिसतात.

पोट खराब असेल तर तात्पुरते घरगुती उपाय काही प्रमाणात नक्कीच आराम देऊ शकतात.
सफरचंदाचे व्हिनेगर : पोटदुखीसाठी सफरचंदाचे व्हिनेगर खूप लाभदायक ठरते. यामध्ये पेक्टीनचे प्रमाणे मुबलक प्रमाणात असते. यामुळे पोटदुखी आणि मुरडा येणे यापासून आराम मिळतो. तसेच यातील आम्लीय गुण खराब पोटातील संक्रमण बरे करण्यास उपयोगाचे ठरते. एक चमचा व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून ते प्यावे.
आले : पोट बिघडल्यास आल्याचा वापर खूप फायद्याचा ठरतो. यामध्ये अॅेन्टीफंगल आणि अॅ न्टीबॅक्टेरीयल घटक असतात. ते पोटदुखीपासून आराम देतात. एक चमचा आले पावडर दुधात मिसळून दिल्यास आराम मिळतो.
दही पोटदुखीत दही फायद्याचे ठरते. यातील जीवाणू संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे पोट लवकर बरे होते आणि ते थंडही राहते.

केळे वारंवार जुलाब होत असल्यास केळ खाणे फायद्याचे ठरते. कारण केळामध्ये पेक्टीन असते ते बांधण्याचे काम करते. तसेच त्यात पोटॅशियम भरपूर असल्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो.

पुदिना पुदिन्याची पाने प्राचीन काळापासून अनेक समस्यांवर उपचार म्हणून वापरली जातात. यातील अॅ्न्टीऑक्सिडन्ट पचन क्रिया सुधारण्यासाठी सहाय्यक ठरतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ संतोष काळे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

4 Comments on पोटदुखीची कारणे

  1. 4 दिवसापासून पोट खुप दुखातेय व उलटी येते जेवण जात नाही लवकर उपाय सांगा

  2. Maze 4 Te 5 divas zale pot dukat ahe Potala tan padlyasark vattay kal Marun julab chalu ahe aswast vattay zop yet nahi please upay Sanga dear Sir. Regards. D.k

  3. सरजी माझा पोट दुःख आहे 7 – 8 दिवसा पासुन सतत . तर काय करु.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..