गोऱ्या साहेबाने १७६६मध्ये भारतात आणल,
१७७४ला कलकत्ता मार्गे,
१७८६ला मद्राससेत पोहोचवल,
शेवटी सगळेच आर्थिक राजधानीत येतात
तसा १७९३ला मुंबईत आलो, आणि
१ ऑक्टो.१८५४ला देशात मला राष्ट्रीय महत्व प्राप्त झाले!
देशात रेल्वेचे जाळे पसरायला लागलेच होते,
आणि १८६३ला माझा प्रवास रेल्वेतून सुरु झाला,
भारत कलेत समृद्ध होताच, त्यात १८७३ रोजी
माझ्याकडून नक्षीदार लीफाफ्याची विक्री सुरु झाली!
१८७६ला भारत पोस्टल युनियन मध्ये सामील झालो,
१८७७ला व्हीपीपी आणि पार्सल सेवेचा आरंभ झाला,
१८७९ला पोस्टकार्डाच्या आरंभाने,
दूरदूरचे नागरिक जवळ आले !
११८० मध्ये मनीऑर्डरच्या शुभारंभाने,
गावाकडील गोरगरीबांना पैसे मिळू लागले,
विमानाच्या शोधाने मी १९११ पासून
विमानांतून उडू लागलो !
१९३५ मध्ये इंडीयन पोस्टल ऑर्डर सुरु झाले,
पत्र-पार्सल योग्य ठिकाणी मिळण्यासाठी,
१९७२ला पिनकोडची सुरवात झाली,
त्यामुळे सबबी आणि दिरंगाई बंद झाली!
देशात तेव्हां विम्याचा भर होता,
१९८४ला जीवनात माझ्या विमा अविभाज्य भाग झाला,
पत्र-पार्सलस् लौकर मिळावीत म्हणून,
१९८६ला स्पीड पोस्ट सुरु झाले,
ग्रामीण भाग पाठी राहू नये म्हणून,
१९९५ला ग्रामीण जीवन बिमा सुरू झाला,
१९९६ला मिडिया डाक सेवा सुरु झाली,
१९९७ला बिझनेस पोस्ट सेवेस सुरवात झाली!
१९७५ला “आर्यभट्ट” उपग्रहाने वसुंधरेला प्रदक्षिणा केली,
आणि १९९८ उपग्रह डाक सेवा सुरु झाली,
एकमेकांच्या शुभेच्छांना गती देत,
२०००साली ग्रीटिंग पोस्ट सेवेने प्रारंभ केला!
२००१ला इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्सफर सेवेने,
आर्थिक उलाढाल वाढण्यास सुरवात झाली,
३० जानेवारी, २००४ ई-पोस्ट सेवेत भर पडली,
आणि १० ऑगस्ट २००४ लॉजिस्टिक सेवा सुरु झाली!
आता तर मी काही वर्षांत बँकेचे स्वरूप घेईन,
आणि गोरगरिबांची सेवा करायल
खेडेगावात जाईन !
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply