राष्ट्रभक्तीची भावना प्रखर असली, की समोर मृत्यू जरी येऊन उभा राहिला तरी त्याची तमा नसते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्यूला कवटाकेल्या अनेक क्रांतिकारकांनी हे सिद्ध केले आहे. या राष्ट्रभक्तीला कशाचेच बंधन नसते. ना वयाचे, ना जातीचे, ना धर्माचे. खान्देशातील बाल शिरीषकुमारची कथा हेच सांगून जाते. इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाची लाट देशभर उसळली होती व हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारचेही जोरदार प्रयत्न चालू होते. नंदूरबारला एका शाळेत शिकणाऱ्या बारातेरा वर्षांच्या शिरीषकुमारचे मन इंग्रजांविरुद्ध बंड करून उठले. गोऱ्या राजवटीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी जेव्हा नंदूरबारला मिरवणूक निघाली, तेव्हा शिरीषकुमार तिरंगा झेंडा घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होता. इंग्रजी सैनिकांनी मिरवणूक हाणून पाडण्यासाठी प्रथम लाठीमार केला; तरीही मिरवणूक पांगली नाही’ शेवटी बंदूकधारी इंग्रज सैनिक आले. त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली तरीही बहादूर शिरीषकुमार डगमगला नाही. तो आपला तिरंगी झेंडा घेऊन पुढे चालतच राहिला आणि कोठूनतरी एक गोळी सूऽऽ सूऽऽ करीत आली अन् शिरीषकुमारच्या छातीत घुसली आणि तो खाली कोसळला. मात्र हातातील झेंडा त्याने शेवटपर्यंत सोडला नाही. ‘ भारतमाता की जय’ असे म्हणतच त्याने शेवटचा श्वास मोडला. शिरीषकुमारची ती प्रखर राष्ट्रभक्ती पाहून सारेच धन्य झाले. आजही नंदूरबार म्हटले की, सर्वप्रथम हुतात्मा शिरीषकुमारची आठवण येते.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply