२९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी बरीच तारीफ झाली होती.
कालांतराने १९५२ मध्ये प्रभात कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply