नवीन लेखन...

प्रसिद्धीविन्मुख उद्योज – श्री प्रभाकर देवधर

|| हरि ॐ ||

दैनिक प्रत्यक्षने आतापर्यंत आपल्याला विविध पैलूने ओतप्रोत भरलेल्या अनेक व्यक्तिमत्वांची ‘चालता बोलता इतिहास’या सदरात देशातील प्रसिद्धीविन्मुख अश्या विविध क्षेत्रातील काही चतुरस्त्र व्यक्तिमात्वांची ओळख सर्व देशाला करून दिलीच तसेच कित्येक दिवस त्यावर लेखमाला लिहून त्यांच्या कलागुणांना प्रसिद्धीही दिली आणि त्यापैकीच एक अभिनव उद्योजक श्री प्रभाकर देवधर.

श्री जितेंद्र रांगणकर यांनी दैनिक प्रत्यक्षच्या ‘चालता बोलता इतिहास’ या सदरातून महाराष्ट्रातील मराठी उद्योजक श्री.प्रभाकर देवधरांच्या मुलाखतीचे उत्कृष्ट शब्दांकन करून सर्व वाचकांना ओळख करून दिली. त्याबद्दल श्री प्रभाकर देवधर आणि श्री जितेंद्र रांगणकर यांचे आम्हीं आभारी आहोत. श्री प्रभाकर देवधरांच्या कामाची व्याप्ती, पद्धत, आत्मविश्वास आणि धडाडी इतर उद्योजकांना दिपस्थंबासारखीच आहे. प्रत्येक गोष्ट स्वत: आधी करायची आणि मगच लोकांना सांगायचे. श्री देवधरसाहेब उद्योगधंद्यातील चांगले वाईट स्वानुभव, चढ-उतार, व्यवसायातील अत्यंत उपयुक्त क्लुपत्या आणि निस्वार्थ मार्गदर्शन, तरुण आणि उदयोन्मुख उद्योजकांना, त्यांच्या उद्योगधंद्यात उपयोगी पडतील अश्या पद्धतीने समजावून सांगतात.

तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पहिल्या भेटीत श्री प्रभाकर देवधर यांनी त्यांचे मन जिंकले. श्री राजीव गांधी आणि श्री देवधरसाहेबांच्या समविचारसरणीमुळेच दोघांतील हृणानुबंध जास्त घट्ट झाले. टीव्ही आणि संगणक उत्पादन कमी खर्चात कसे करता येईल या टेक्नोलॉजीचा श्री देवधर साहेबांनी सर्वव्यापक अभ्यास करून भारतात त्या काळी या उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणली. पुढे तत्कालीन पंतप्रधान श्री राजीवजींनी या क्षेत्रातील सल्लागार म्हणून श्री देवधरसाहेबांची नेमणूक करू त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्यांनी त्या धैर्याने आणि कुशलतेने सांभाळल्या असे त्यांच्या कार्याच्या व्यावाप्तीवरून दिसून येते.

‘एमटीबी’ ‘मटेरियल टेक्नोलॉजी ब्रँडनेम’ या योजनेच्या वापरावर त्यांचा विश्वास आणि भर सर्व मुलाखतीतून दिसून येतो. ते म्हणतात जागतिकीकरणाच्या युगात बलाढय बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सामना करण्यासाठी ‘एमटीबी’ ‘मटेरियल टेक्नोलॉजी ब्रँडनेम’चा उपयोग नकीच यशस्वी होईल असे बंगळुरूमधील चहाच्या टपऱ्यांच्या उदाहरणाने देतात. ‘मटेरियल टेक्नोलॉजी ब्रँडनेम’ ‘एमटीबी’ ही केवळ टीव्ही, कॉम्पुटर किंवा इलेट्रोनिक्स उत्पादनांपुरती मर्यादित राहणारी संकल्पना नाही. तर तिचा कुठल्याही क्षेत्रासाठी विस्तार करता येईल.

चीनी शासन व्यवस्था आणि उद्योजकांबद्दल्लचा भारतातील जनमानसात असलेला गैरसमज काही अंशी दूर करण्याचा श्री देवधरांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या आणि आपल्या उद्योजकांचे गुण/दोष दाखवून चीनी उद्योगजगताकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. जीवनात मिळणाऱ्या संधीचा स्वत:साठी आणि देशाचा आर्थिक आणि सामाजिक फायदा उद्योगधंद्यातून कसा करून घ्यावयाचा याचे उत्तम मार्गदर्शन वेळोवेळी त्यांच्या मुलाखतीच्या शब्दांकनातून श्री जितेंद्र रांगणकर यांनी करून दिले. याची प्रचीती अमेरिकेतील ‘इंजिनिअरिंग सोसायटी’ नावाच्या प्रख्यात संस्थेने ‘इंजिनिअरिंग मॅनेजर ऑफ द इयर’ म्हणून १९९० साली त्यांची निवड केली. मुख्य म्हणजे कंपनीच्या अध्यक्षपदावर असताना केलेल्या कामाला आंतरराष्ट्रीय स्थारावरून मिळालेली ती दाद होती. विशेष म्हणजे त्यानंतर आजतागायत कुणाही भारतीयाला हा सन्मान मिळालेला नाही असे ते सांगतात.

१९८१ साली पॅरीस येथे आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी ‘२१व्या शकतील विकास’ या विषयावर व्याख्यान दिल होत आणि डेव्हलपमेंट अर्थात विकास म्हणजे काय, हा मुलभूत प्रश्न त्यांनी या परिषदेत उपस्थित केला होता. आणि त्यासंदर्भात महात्मा गांधीजींची गोष्ट त्यांनी सांगितली ती अशी “आत्ताची जी जागतिकीकरणाची संकल्पना मांडली जाते, त्याच्या अगदी विरुद्ध टोकाची संकल्पना गांधीजींनी मांडली होती. चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या काही आपल्या गरजा आहेत, त्या भागविण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपल्या परिसरातच आहेत. आपण पायाने चालत मिळवू शकतो, इतक्या अंतरावर या गोष्टी उपलब्ध असताना, खेड्यापाड्यातही स्वयंपूर्ण जीवन जगणं सहज शक्य आहे” हे विचार त्यांना रुचले म्हणजे श्री.देवधरांनाही खेडोपाडीचा विकास अभिप्रेत आहे नुसते शहरे सुधारून फक्त भौतिक बदल होतील पण नागरिकांच्या मानसिकता आणि इच्छाशक्ती बदलणे गरजेचे आहे.

तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधींच्या निधनानंतर भारताने श्री देवधर साहेबांचा ते काम करत असलेल्या क्षेत्रात पुढील काळात पाहिजे तसा उपयोग करून घेण्यात आला नाही. कंपनीचे अध्यक्षपद सोडल्यानंतर कंपनीची काय दुरावस्था होते ह्याची खंत कुठेनाकुठे मुलाखतीतून डोकावते.

एकंदरीतच श्री. प्रभाकर देवधरांच्या विचारसरणीचा आणि गाढ्या अनुभवाचा फायदा जर भारतीय तरुण उद्योजकांनी घेतला आणि कृतीतून उतरवला तर प्रत्यक्षचा ‘चालता बोलता इतिहास’ भारताचे विज्ञान/तंत्रज्ञान सुधारून भूगोलाची व्याप्ती वाढवून इतिहास घडवेल अशी आशा बाळगूया !

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..