खरेदी केला सुंदर पक्षी
दाम देवूनी योग्य असे ते
नक्षिदार तो पिंजरा घेवूनी
शोभिवान मी केले घरातें
प्रातःकाळी उठोनी बघतां
चकीत होऊनी गेलो मनीं
पक्षाने त्या मान टाकली
पडला होता तळांत मरुनी
क्षणभर मनीं खंत वाटली
राग आला स्वकृत्याचा
आकारण ती हौस म्हणूनी
खरेदी केला पक्षी याचा
किती बरे निच मन हे ?
निराशा त्याला धन हानीची
पक्षाने तो प्राण गमविला
विषण्णता परि दुय्यम याची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
Leave a Reply