तुरुंगातील कैद्यांची पाहणी करण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली होती. एक निवृत्त न्यायाधीश त्या समितीचे प्रमुख होते. या समितीने तुरुंगात जाऊन तेथील कैद्यांची पाहणी सुरू केली. सहज कुतूहल म्हणून समितीच्या प्रमुखांनी काही कैद्यांना त्यांनी कोणता गुन्हा केला व त्याला का शिक्षा झाली याची चौकशी करायला सुरुवात केली. एक कैदी म्हणाला, मी खरे तर कोणताच गुन्हा केला नव्हता, परंतु साक्षीदारानेच माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली. त्यामुळे मला तुरुंगात यावे लागले. दुसरा कैदी म्हणाला, माझ्याविरुद्ध काही लोकांनी हेतुपुरस्सर खटला भरला. मला तुरुंगात डांबणे हाच त्यांचा उद्देश होताच तो सफल झाल्यामुळेच मी आज तुरुंगात आहे. तिसरा कैदी म्हणाला, खरे तर मी निर्दोष होतो परंतु माझ्याबद्दल न्यायाधीशांचे पूर्वग्रह दूषित होते त्यामुळेच त्यांनी मला शिक्षा ठोठावली. थोडक्यात एकही कैदी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नव्हता. एका कोपऱ्यात एक कैदी मात्र खाली मान घालून बसला होता. त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्याने खाली मान घालूनच उत्तर दिले. होय साहेब! मी चोर केली. कारण माझ्याजवळ एकही पैसा नव्हता. घरात दोन-तीन लहान मुले होती त्यांची उपासमार मला बघवत नव्हती. त्यांचे पोट भरता यावे म्हणून मी चोरी केली. व त्या गुन्ह्याबद्दल मी आज तुरुंगात येऊनशिक्षा भोगत आहेत. समितीच्या सर्व सदस्यांना त्या कैद्याची हकिकत खरी वाटली. व त्यांनी त्या कैद्याची सुटका करण्याची एकमताने शिफारस केली. त्या कैद्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळाले होते.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply