हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिती झिंटा.
प्रिती झिंटाचा जन्म ३१ जानेवारी १९७५ रोजी झाला.‘डिंपल गर्ल’ आणि ‘बबली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिती झिंटा हिने दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या आधारावर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या गालावरच्या खळीचे तर लाखो दिवाने आहेत. १९९८ मध्ये मनी रत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून अभिनेत्री प्रिती झिंटा हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. शेखर कपूर यांनी तिचे नाव सुचवले होते. तिची या चित्रपटातील भूमिका अत्यंत लहान होती. मात्र, मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनिषा कोईरालापेक्षा प्रितीचीच भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये सर्वांत जास्त कमाई करणारा ठरला. या चित्रपटातील निशाच्या भूमिकेसाठी प्रितीला ‘फिल्मफेयर अॅसवॉर्ड’ चा बेस्ट अॅाक्ट्रेस अॅनवॉर्ड साठी नॉमिनेट करण्यात आले होते.
‘वीर-झारा’, ‘सलाम-नमस्ते’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असली तरीही तिच्या चाहत्यांचा आकडा कमी झालेला नाही. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासूनच कोणत्याही बड्या व्यक्तिमत्त्वाच्या पाठिंब्याशिवाय प्रितीने स्वबळावर स्वत:ची अशी एक ओळख प्रस्थापित केली. प्रिती झिंटाच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये तिने ‘वीर-झारा’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेला अनेकांनी पसंती दिली. त्या चित्रपटामध्ये प्रितीने साकारलेली पाकिस्तानी मुलीची भूमिका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेली. त्यामुळे तिच्या अभिनय कारकीर्दीतील हा एक लोकप्रिय चित्रपट आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रिती झिंटाच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी आणखी एक चित्रपट म्हणजे ‘सलाम-नमस्ते’. एका वेगळ्याच विषयाला हात घालणाऱ्या या चित्रपटातील प्रितीच्या भूमिकेने अनेकांचेच लक्ष वेधले होते. सैन्यदलाची पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबातून आलेल्या प्रिती झिंटाने नेहमीच तिचे राष्ट्रप्रेमही जाहिरपणे व्यक्त केले आहे. प्रीती झिंटाने गेल्या चवर्षी तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान अमेरिकन सिटिझन जीन गुडइनफसोबत लग्न थाटले. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी या जोडीने लॉस एंजिलिसमध्ये लग्न थाटले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply