वलयांकित स्त्री-पुरुषांचं नीतिबाह्य वर्तन जनतेच्या लघुस्मरणामुळे व त्यांच्याबद्दलच्या लोकप्रियतेमुळे समाजाच्या पचनी पडतं. त्यांच्या मुलांच्या जीवनात फारसा अडथळा निर्माण होत नाही. पण सर्वसामान्यांनी त्यांचं अनुकरण केल्यास त्यांना कुजबुज, तुच्छतादर्शक कटाक्ष आणि तिरस्कारयुक्त वागणूक समाजाकडून मिळते. प्रथम-पत्नीचे व मुलांचे तळतळाट सुख लाभू देत नाहीत. आपल्या आवडत्या नायक-नायिकांच्या आयुष्याचा असला आदर्श समोर ठेवला तर आजची तरुण पिढी स्वैरच होईल. व्यक्तिस्वातंत्र्य व स्वैराचार यांच्या सीमारेषा फार अंधूक होत आहेत हे दिवसेंदिवस जाणवत आहे. त्यागमय प्रेमाऐवजी भोगवादी प्रेम स्वीकारलं जात आहे. यामागे जीवन क्षणभंगुर असण्याच्या भावनेइतकीच प्रेम क्षणभंगुर असण्याची भावना जास्त आहे.
— भालचंद हादगे उर्फ भाली
Leave a Reply