युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।।
तेजपुंज तो आदिपुरुष अवनीला हे उमने तारेतेजामध्ये त्याच्या विरणे हेच तियेचे जीवनगाणे ।।२।।
स्वत:भोवती गरगर फिरता आदित्याची पाठ सोडिताप्रेमाचे ते आतूर नाते कदाकदापि ती तोडिना ।।३।।
स्वयंआकाशी एकमान तो गुंगुन जाई विश्वामध्ये त्यास वेळ ना धरतीसाटी कर्तव्याचे गिरणी धडे ।।४।।
चूक कुणाची पृथ्वीची का प्रमासाठी गरगर फिरतेचूक कुणाची सूर्याची का कर्तव्याची सदा भिरभिरे ।।५।।
प्रेमाचा हा रंग वेगळा प्रेमाचा हा न्यारा नाराकर्तव्याची दुजी प्रेरणा नर नारींची कथा पुराणा ।।६।।
दोष नारीचा त्यात असे ना दोष नराचा कुठे दिसे नानिसर्गनिर्मित दोन ऐरणा कविमनांची काव्य कल्पना ।।७।।
— जयंत वैद्य
Leave a Reply