प्रेम कसं !
हळुवार यायला हवं
तुमच्या आयुष्यात
जशी कडक उन्हात
तुमच्या अंगाची
लाही लाही होत असताना
एखादी वाऱ्याची
हलकीशी झुळूक
येते तशी…
प्रेम कस !
आनंदात ,बागडत
आणि उडत यायला हवं
तुमच्या आयुष्यात
तुम्हाला एक नाजूक ,
सुंदर आणि आकर्षक
फुल समजून
एखाद्या रंगीबेरंगी
फुलपाखरासारखं…
प्रेम कसं !
स्वप्नात नसतानाही व्हावं
त्यात गुंतून पडावं
पण का ?
ते आपल्यालाच न कळावं
हे सारं योगायोगानेच घडलं
असं आयुष्यभर वाटत राहावं….
प्रेम कसं !
स्वतःहून
तुमच्या हृदयाच्या दरात
उभं राहायला हवं
अचानक
आणि तुम्हाला आपल्या मिठीत
भरून घ्यायला हवं अकल्पित !
अगदी तसं जसं
स्वप्न प्रत्यक्षात उतरत तस…
प्रेम कसं !
करून होऊ नये
ते आतून अंतर्मनातून
निर्माण व्हायला हवं
अदृश्य अगम्य
आणि अनाकलनीय मार्गाने
ते चालत चालत जायला हवं
एका हृदयातून
दुसऱ्या हृदयात
अगदी सहज
आणि वाटत राहावं
दोघांनाही
गतजन्मीची
अपूर्ण भेटच
या जन्मात होतेय …
©निलेश बामणे
Leave a Reply