नवीन लेखन...

प्रेम

चित्रपटातील एखादे नायक – नायिका जेंव्हा आपल्याला आवडत असतात तेंव्हा त्यांच चालणं, बोलणं, ह्सणं, रडणं, नाचणं सारच आपल्याला आवडत असत. पण याचा अर्थ आपलं त्यांच्यावर प्रेम आहे असा होत नाही ना, सांगायच तात्पर्य इतकच आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आवडण्यातून एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण होऊ शकत पण प्रेमातून आवड निर्माण होईलच याची खात्री नाही देता येत. एखाद्या व्यक्तीची आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि प्रेमात पडल्यावर आपल्याला आवडणार्‍या गोष्टी त्यालाही आवडाव्यात अशी अपेक्षा करतो तेंव्हा होतो तो प्रेमभंग असतो.

आजकालच्या तरूण-तरूणींच्या बाबतीत नव्हें तर अविवाहीत- विवाहीत सर्वांच्याच बाबतीत आपल्याला आवडणार्‍या चित्रपटातील नायक – नायिकेशी, आपल्या स्वप्नातील राजकुमार- राजकुमारीशी मिळ्त-जुळ्त कोणी आलं की आपण त्याच्या प्रेमात पडतो. हे सारं ठिक आहे पण ह्ल्ली काही लोक प्रेमात का पडले हे त्यांच त्यांनाच माहीत नसत त्याच काय ? आजकाल आपल्या बरोबरची इतर मंडळी प्रेमात पडली म्ह्णून आपणही प्रेमात पडायला हंव असही बर्‍याच जणांना वाटत असत. त्या वाटण्यातून आपण जिच्या प्रेमात पडावं अशी व्यक्ती ते शोधत असतात, त्यामुळे अर्थातच त्यांच्या आयुष्यात प्रेम चोरपावलांनी न येता ते ओढून- ताणून आणलेल असत म्ह्णून प्रेमविवाह करणारी काही जोडपी विवाहानंततर दुःखी असल्याची जाणवतात कारण त्यांचा अपेक्षाभंग झालेला असतो. उदा. एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराला प्रेमात असताना बहुदा त्याची छोटी –मोठी व्यसने सोडण्याचा अट्टहास करीत नाही पण तिच त्याची बायको झाल्यावर त्याची छोटी-छोटी व्यसनेही तिला खटकू लागतात. लग्नापूर्वी प्रेयसी जास्त बोलत असेल तर ते त्याला ऐकत राहावस वाटत असत पण लग्नानंतर त्याला तेच डोकेदुकी ठरू लागत.

मैत्रिच्या झाडाला हमखास येणार फल जरी प्रेम असल तरी ते खायच की नाही हे ठरविण आपल्याच हातात असतं. दोघांपैकी एकाला ते खावस वाटल तरी ते खाण शक्य नसत, मैत्रिच्या झाडाला येणार प्रेमाच फल खाण फारच अवघड असत, त्याच्यात प्रेम आणि मैत्री दोन्हीं गमावण्याच भय अधिक असत. मैत्रिच्या झाडाला प्रेमाच फल लागलेल असतानाही ज्यांनी ते खाल्लेल नसत त्यांच्यातील प्रेम हे खरं प्रेम असत अस म्ह्णता येईल कारण त्या दोघांमध्ये काहीही नात नसताना त्यांच्या मनात एकमेकांबद्दल ओलावा असतो, त्यांच्यातील संवाद एकमेकांच्या हितासाठीच निस्वार्थीपणे साधला जातो. त्यांच्या आयुष्यात असणारया इतर नातेसंबंधाची त्यांना कधीच अडचण भासत नाही, त्यांच्यात भाडण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना एकमेकांना कधीतरी दुरून पाहण आणि अपघाताना भेटले तर बोलणही पुरेस असतं. पण आज प्रेम करणारे एकमेकांना आपल्या बापाचा माल समजतात आणि तसेच वागतात. माणूस असून जनावरांसारखे वागताना दिसतात तेंव्हा त्यांच्यात प्रेम आहे किंव्हा होत म्ह्णण हे प्रेमाचा अपमान करण्यासारख वाटत. चार ओळींच त्याही दुसर्‍या कोणाच्या तरी चोरलेल्या कागदावर लिहायच्या आणि प्रेमपत्र म्ह्णून एकमेकांना द्यायचं त्या वाचून प्रेमात पडायचं. प्रेमात पडण अथावा प्रेम करण इतक सोप्प असतं. ह्ल्ली तर काही प्रेमाची दलालीही करताना दिसतात जे कित्येकांची प्रेमप्रकरणे घडवून किंवा जुळ्वून आणतात. त्या प्रेमाच्याच्या दलालांना तरी खरं प्रेम कधी कळ्लेल असत का ? प्रेम मिळ्वण फार सोप्प असतं पण प्रेमासाठी त्याग करण फार अवघड असत. आजकाल प्रेमाच्या नावाखाली बरच काही खपवल जातं. खंर प्रेम झाकलं जातं आणि वासनेला प्रेमाच्या रंगात रंगवून त्याचच खरं प्रेम म्हणून जगासमोर प्रदर्शन मांडल जातं. प्रेमातील त्यागच ज्यांना कळ्ला नाही त्यांना प्रेम काय करणार ? वासनेला प्रेम समजून प्रेम- प्रेम कोकळ्त फिरणार्‍यांना , काल्पनिक कथेतील काल्पनिक त्या प्रेमविरांसारखे…..

लेखक – निलेश बामणे.

 

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..