नवीन लेखन...

प्रेम…

प्रेम
एक स्त्री
एक पुरुष
यांचे मिलन नसते…

प्रेम
समुद्र
आहे अमर्याद
खोल अथांग…

प्रेम
पाण्यात साखर विरघळते
तसे विरघळणे असते
अस्तित्वात नसतानाही
आपला गोडवा राखणारे…

प्रेम
मेणबत्ती सारखे
जळणे असते
जगाला प्रकाश देत…

प्रेम
फक्त मरणे असते
जगणे त्यास माहीतच नसते

प्रेम
एक भ्रम असते
जे साऱ्या जगाला भ्रमित करते…

©निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

No posts found.
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..