मी बेडूक बेडकीच्या प्रेमात पडलो
आणि उगाच उडया मारू लागलो…
आमची जात भले एकच होती…
मी समुद्रातील बेडूक होतो
ती डबक्यातील बेडकी होती…
डबक्यात बऱ्याच बेडक्या होत्या
समुद्रातील मी एकटा बेडूक होतो…
तिचे विचार डबक्यासारखे संकुचित
आणि माझे समुद्रासारखे अथांग…
आम्ही एकाच जातीचे तरी निराळे होतो…
तिला तीच डबकच जगासारखं वाटत होतं
समुद्रातील माझं जग तर अमर्याद होतं…
प्रेमासाठी मी चुकून समुद्रातून डबक्यात आलो होतो
तरी माझ्या समुद्राला त्याच्या अथांगतेला मी विसरणार नव्हतो…
डबक्यातील बेडकीला त्यामुळेच मी समुद्रात घेऊन जाऊ शकणार होतो…
कवी – निलेश बामणे ( बी डी एन )
Leave a Reply