नवीन लेखन...

फळांची सालही आहे शरीरासाठी उपयुक्त

अनेकजण फळांची साल काहीच कामाची नाही म्हणत ती फेकून देतात. मात्र, त्यामध्येही भरपूर अँटिऑक्सिडंट आणि पोषक द्रव्ये असतात. तसेच ही साल आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते.

जाणून घेऊया फळांच्या सालीचे फायदे..

संत्रा – संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉइड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. एका अमेरिकन संशोधनानुसार संत्र्याच्या सालीमध्ये ज्यूसच्या तुलनेत २० पट अधिक  अँटिऑक्सिडंट्स असतात. केकमध्ये या सालीचा वापर केल्यास चव येते.

पपई – पपईचा गर टाचेवर चोळल्यास भेगा लवकर बर्‍या होतात. पपईमध्ये भरपूर ‘अङ्क जीवनसत्त्व आणि पापेन नावाचा घटक असतो. यामुळे मृत पेशींपासून मुक्तता मिळते.

डाळिंब – पोटाशी संबंधित विकार झाल्यास डाळिंबाची साल पाण्यात उकळून घ्या. तसेच त्यात दालचिनीचे काही तुकडेही टाका. थंड झाल्यावर हे
पाणी प्राशन करा. हे पाणी दररोज तीनवेळा पिल्यास पीडितास फायदा मिळतो.

सफरचंद – सफरचंदाच्या सालीमध्ये अरसोलिक अँसिड नावाचे रसायन असते. त्यामुळे ही साल एवढी चमकदार असते. सालीसह सफरचंदाचे सेवन केल्यास स्नायूंचा विकास होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

केळी – शोच्या झाडांची पाने चमकदार बनवण्यासाठी केळीच्या सालींचा वापर केला जातो. केळीची साल नैसर्गिक कीटकनाशकाचे आणि खताचे कामही करते. जखम झाल्यावर केळीच्या सालीचा मऊ भाग लावल्यास आराम मिळतो.

नाशपाती – या फळाच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या क्लोरोझेनिक अँसिड अँटिऑक्सिडंट आणि फ्लोरेटिन  नावाच्या फ्लेव्होनॉइडमुळे कँसरग्रस्त पेशी पसरत नाहीत. त्यामुळे या फळाचे भरपूर सेवन केले पाहिजे.

पीच – या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आणि ‘अङ्क जीवनसत्त्व असते. या फळामुळे त्वचा कोरडी राहते. याच्या सालीत साखरेचे काही दाणे ठेवून चेहर्यावर
चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी हटतात आणि चेहरा उजळतो.

किवी – या फळाच्या सालीमध्ये गराच्या तुलनेत तिप्पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच या फळाच्या सालीमुळे अँलर्जी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही वाढते. हे फळ विषबाधेस जबाबदार असलेल्या स्टेफिलोकोकससारख्या जिवाणूंपासूनही संरक्षण करते.

(आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन) 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..