नवीन लेखन...

फॅंड्री : एक गडद वास्तववाद

आजवर मराठी चित्रपटसृष्टीत अनेक आशयसंपन्न तथा विविध विषय हाताळलेले सिनेमे येऊन गेले आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅंड्री हा देखील त्याच धरतीवरचा असला तरी मराठी सिनेमांची परिभाषाच बदलून टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे. चित्रपटात काय दाखवले गेले आहे याची पुसटशी कल्पनाही न येण्यामुळे सिनेमाबाबतची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती आणि त्यातच जर सिनेमात जे काही

दाखवलयं ते प्रामाणिकपणे स्विकारले तर चित्रपट थेट काळजाला भिडतो.

उपेक्षित असलेल्या खालच्या जातीतील जब्या (सोमनाथ अवघडे) नामक किशोरवयीन मुलाची ही कथा. जब्याला आपल्या जातीबाबत आणि स्वत:च्या काळ्या सावळ्या वर्णाबद्दल न्युनगंड आहे. आपल्याच वर्गातील उच्च जातीतली शालू (राजेश्वरी खरात) त्याला आवडतेय. शालूनेही आपल्यावर प्रेम करावे ही त्याची मनोमन इच्छा पण त्यासोबतच आपल्या जातीय स्तराचे वास्तव देखील तो चांगले जाणतो त्यामुळेच स्वप्न आणि वास्तव यांच्याशी त्याचा रोजचा संघर्ष अटळ झाला आहे. आपली जात आणि आपल्या जगण्यातले विदारक सत्य शालूसमोर येऊ नये यासाठी जब्या सर्वतोपरी प्रयत्न करतो मात्र पुढे अशा काही घटना घडतात की तो लपवू पाहत असलेले त्याच्या जगण्याचे वास्तव त्याला स्वत:लाही मान्य करावे लागते. मग जातीव्यवस्था, स्वत:तला न्यूनगंड आणि निरागस स्वप्नांमागे लपलेल्या गडद वास्तववादामुळे त्याचा राग प्रकटतो आणि फॅंड्री या शब्दाचा अर्थ अनेक पातळींवर व्यक्त होतो. 

सिनेमाची कथा ही केवळ एक प्रेमकथा नसून त्याला वेगवेगळे शेड्स आहेत. जब्याचे वडील करत असलेले काम, त्या कामाबाबत अमुक एका जातीबद्दलची समाजाची विचारधारा, चंक्या नावाची एक विचित्र व्यक्तीरेखा तथा त्याने शालूवर मोहिनी घालण्यासाठी जब्याला दिलेला कानमंत्र, ग्रामीण शिक्षण आणि जब्याचे कुटुंब अशा अनेक गोष्टी सिनेमा एकाच वेळेला अधोरेखीत होतात. ही कथा कुठेच सिनेमाच्या चॊकटीत न बसता देखील नेमकेपणा आणि अकृत्रिमपणाच्या जोरावर प्रेक्षकांचा कथेतला सहभाग वाढवते. एक प्रेमकथा असली तरी ती शाळा, बालक-पालक आणि टाईमपास अशा तद्दन व्यावसायिक गणितसूत्रात न बसता वास्तविकता प्रखरपणे मांडते. काही दृश्य इतकी नॆसर्गिक आहेत की हे सगळे आपल्या आजूबाजूला देखील घडते किंबहूना आपल्या डोळ्यासमोरच घडतेय याची प्रचिती येते. क्लायमॅक्स ला जब्याचा आपल्या वडलांशी आणि समाजाशी दाखवलेला संघर्ष थक्क करणारा आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेने स्वत: लिहलेली कथा, पटकथा ही थेट आणि नेमकेपणाने मांडण्यात यशस्वी झाला आहे. किशोर कदम सारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या तोडीस सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात आणि सुरज पवार यासारख्या नवख्या कलाकारांकडून अस्सल अभिनय करून घेतल्याने दिग्दर्शकाला आऊट ऑफ गुण मिळायला हवे.

अभिनयाच्या बाबतीत किशोर कदम यांनी रंगवलेला नाना स्मरणात राहतो. त्यांच्या आजवरच्या सिनेमातली सर्वात इंटेन्स ॲक्टींग या सिनेमात पहावयास मिळते. यासाठी त्यांनी घेतलेली शारिरीक मेहनत देखील दखलपात्र आहे. सोमनाथ अवघडेने साकारलेला जब्या मन जिंकणारा आहे. त्याचा निरागस चेहरा, बोलीभाषा आणि हलगीवादन सर्वच लाजवाब आहे. त्यासोबतच राजेश्वरी खरात, सुरज पवार, छाया कदम आणि छोट्या भुमिकेतील नागराज मंजुळे यांच्याही भुमिका स्मरणात राहतात.

सिनेमाचे छायाचित्रण कथेशी अनुरूप असून पार्श्वसंगीतही चित्रपटातील घटनांशी मेळ साधणारे आहे.

— स्वप्नील मानव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..