नवीन लेखन...

फॅंड्री– एक सामाजिक चित्रपट

फॅंड्री चित्रपटाच्या सुरूवातीलाच उडणारी एक काळी चिमणी म्ह्णजे आजही समाजात जाती- भेद मुक्तपणे संचार करतोय हे दर्शविण्याचा तर प्रयत्न नव्हता ना ? फॅंड्री चित्रपट पाहणे बर्‍याच दिवसापासून मनात होते पण तो पाह्ण्याचा योग काही येत नव्हता. तो योग शेवटी एकदाचा आला मी माझ्या दोन जिवलग मित्रांसोबत तो चित्रपट पाहिला. खास वेळ काढून आंम्ही तो चित्रपट पाहायला गेलो होतो. मी स्वतः एखादा चित्रपट पाहायला जातो तेंव्हा त्या चित्रपटाबद्दल माझ्या मनात उतसुक्ता ही असतेच विनाकारण चित्रपट पाहायला जाण्याची मला सवय नाही आणि त्यासाठी ही मी फक्त मराठी चित्रपटांचाच विचार करतो. बर्‍याच दिवसापासून मी फॅंड्री चित्रपटाविषयी ऐकत होतो वाचत होतो. त्यामुळे त्या चित्रपटाविषयी माझ्या मनात कुतुहल होतेच. हा चित्रपट मी डोळे आणि माझ्या मेंदुची कवाडे उगडी ठेऊनच पाहिला. चित्रपटातील नायक सातवीत शिकणारा एक सामान्य गरीब विद्यार्थी पण चित्रपटात तो एका समाज व्यवस्थेच प्रतिनिधीत्व करताना दिसत होता. त्याच्यावर होत असणार्‍या अन्यायाची चीड त्याच्या चेहर्‍यावर सतत दिसत होती अगदी तो हसतानाही. हा चित्रपट प्रेमकथेवर बेतलेला नाही त्यामुळे टाईमपास आणि या चित्रपटाची तुलना करणे योग्य होणार नाही. फॅंड्री हा चित्रपट पुर्णपणे सामाजिक समस्यांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. एक सामाजिक जाणिव जपणारा चित्रपट आहे. या चित्रपटात ज्वलंत सामाजिक समस्या मांडण्यासाठी प्रेमाचा किंचित आधार घेतला गेला आहे इतकच ! हा चित्रपट पाहताना आपल्याला सुरूवातीला वाटून जात की हा चित्रपट दहा- वीस वर्षापूर्वीच्या समस्यांवर भाष्य करतोय की काय ? पण या चित्रपटात केला गेलेला मोबाईल आणि फेसबुकचा वापर या चित्रपटात दर्शविलेला काळ आजचाच आहे हे स्पष्ट करतो म्ह्णजे आज आपण फेसबुकच्या माध्यमातून जगाच्या इतक्या जवळ आलेलो असतानाही आपल्याच राज्यातील अगदी शहरा जवळ असणार्‍या खेड्यातील काही भागात लोकांकडे आजही राहण्याजोगे घर नाही ,वीज नाही, शौचालय नाहीत. तेथे आजही जाती-भेद मानला जातो जपला जातो आणि प्रसंगी पोसला ही जातोय, आजही तेथील लोकांच्या मनातील अंधश्रध्दा दूर झालेल्या नाहीत .या चित्रपटाचा नायकच काळया चिमणीला जाळून तिची राख कोणावर उधळल्यास ती व्यक्ती आपल्या प्रेमात पडते या अंधश्रध्देने ग्रासलेला दाखविलेला आहे या अंधश्रध्देपायी निसर्गातील काळ्या चिमण्यांच अस्तित्व तर धोक्यात आलेले नाही ना ? हा प्रश्न ही मनात निर्माण झाल्या वाचून राहत नाही. आजही समाजात किती उगडपणे हुंडा दिला घेतला जातो आणि ते दाखविताना आजही समाजातील काही पुरूष स्त्रियांना एक भोग वस्तूच समजतात हे दर्शविण्याचा प्रयत्नही या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला दिसतो. समाजातील काही लोक असं जीवन जगता आहेत की त्यांना शिक्षण वगैरे गोष्टींपेक्षा ही आपल्या पोटापाण्याचा विचार करण्यावर अधिक जोर द्यावा लागतो. समाजातील पुढारलेला वर्ग निम्न स्तरातील लोकांशी आजही तुसड्या सारखा वागतो. अगदी शाळेतही पाटलाच्या मुलाला शिक्षकांनी शिक्षा न करणे यातून ते अगदी सहज दर्शविण्याचा प्रयत्न या चित्रपटात केलेला आहे. माणसांच्या अन्न वस्त्र आणि निवारा या मुलभुत गरजाच पुर्न होत नसतील तर माणसांचा स्वभाव रागीट होत जातो, त्यात त्याच्या जाती अथवा तो करीत असलेल्या कामावरून समाजात त्याची हेटालणी होत राहिली तर एक दिवस हे सारे असहय होऊन गुन्हेगारीकडे वळू शकतो हे दर्शविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. या चित्रपटात एका डुकराला पकड्ण्यासाठी स्वतःच्या जीवाची काळजी न करता पळापळ करणार्‍या संपूर्ण कुटूंबाच राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभं राहणं जे काही सांगून जात ते केवळ शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. चित्रपट पाहताना चित्रपट केंव्हा सुरू झाला आणि केंव्हा संपला ते कळलच नाही. हा चित्रपट पाहताना मला काही प्रेक्षकांच्या हसण्याचे आवाज कानावर येत होते त्यांच ते हसण मला किंचित व्यतीत करून गेल. चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ आणि इतरांच कौतूक करावं तितक कमीच आहे. त्यांच्या कामाची पोच पावती त्यांन मिळ्ते आहेच आणि यापुढेही मिळ्त राहणारच आहे. मराठी चित्रपटाच्या सामाजिक जाणिव जपण्याच्या परंपरेत या चित्रपटामुळे मोलाची भरच पडलेली आहे हे नक्की…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..