फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर नसताना फोटोशॉपची फाइल, फ्लॅश अँनिमेशन, झीप फाइल, अँपल पेजेसच्या फाइल्स, आऊटलूक मेसेजेस, विविध प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स, पीडीएफ किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस नसताना वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटच्या फाइल्स ओपन करण्यासाठी फ्री ओपनर हे अत्यंत उपयोगी अँप्लिकेशन आहे. तब्बल ८0 विविध प्रकारचे फाइल्स तुम्ही या अँप्लिकेशनमध्ये ओपन आणि एडिटही करू शकता. काही अँप्लिकेशन्स आपल्याला नेहमी लागत नाहीत. त्यामुळे असे अँप्लिकेशन्स डाऊनलोड करून हार्डडिस्कवरील जागा अडवून ठेवण्याऐवजी फ्री ओपनर सारखे अँप्लिकेशन वापरू शकतो.
आजकाल आपण सोबत कॅरी करू शकू अशा, अत्यंत हलक्या लॅपटॉप्सना पसंती देऊ लागलो आहोत. अशा लॅपटॉपच्या काही मर्यादा असतात. त्यांवर मात करण्यासाठी फ्री ओपनर उपयोगी पडते. फ्री ओपनर डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कोणतीही फाइल ओपन करा. संबंधित फाइल ओपन करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरवर योग्य प्रोग्राम नसेल आणि ती फाइल फ्री ओपनरमध्ये ओपन होऊ शकत असेल, तर ती ओपन होईल. वर्ड फाइल असेल तर काही ठराविक फॉरमॅटिंग ऑप्शन्ससह वर्ड फाइल फ्री ओपनरमध्ये ओपन होईल.
फ्रीओपनर http://www.freeopener.com या लिंकवरून डाऊनलोड करता येईल.
Leave a Reply