बँकेतूनलोन घेतांना सामान्य मनुष्याला येणाऱ्याअडचणी
१) पगार आमच्या बँकेतच जमा झाला पाहिजे किंवा कंपनीकडून असे लेटर आणा कि कंपनी आपल्या पगारातून मासिक हप्ता कापून बँकेत भरेल, अन्यथा कर्ज मिळणार नाही हि पहिली अट. – कोणत्याही / प्रत्येक मनुष्याला हे काही शक्य नाही.
२) जर कर्जदाराने हप्ते भरले नाही तर कंपनी (तो काम करत असलेली) त्याच्या पगारातून कापून हप्ता बँकेत भरेल असे लेटर – बऱ्याच वेळेला कंपन्या असे लेटर नाकारतात
३) सर्व पेपर एकदम सांगितले जात नाही. एक पेपर दिला कि दुसरा सांगितला जातो. तसेच बॉन्ड पेपर सर्वात शेवटी सांगितले जातात तेव्हा पुन्हा एक चक्कर.
४) कमीत कमी घरासाठी कर्ज ५ लाखापर्यंत घ्यावे लागेल अन्यथा कर्ज मिळणार नाही. अरे जर कमी कर्ज घेतो आहे तर चांगले आहे ना ? पण नाही ५ लाखाच्या पुढेच बोला
५) या भागात आम्ही लोन देत नाही हि तर नेहमीचीच अडचण
६) लोन हे सरकारी किंमातीप्रमानेच मिळेल व्यापारी किंमतीशी आम्हाला काही घेण नाही. सरकारी किंमतीप्रमाणे कर्ज घ्या आणि बाकीची रोख रक्कम तुम्ही स्वतःच भरा. अरे पैसे असले असते तर आम्ही कशाला तुमच्याकडे आलो असतो.
तरी बर खाजगी बँका मार्केट किमतीवर कर्ज देतात जास्ती व्याजाने.
एकूण काय हे सर्व नियम मध्यमवर्गीयांना. उच्च वर्गाचे कर्ज कधी पास होते आणि किती परत येते त्या बँकेलाच माहित.
— सचिन सदावर्ते
Leave a Reply