बंदिशाळा या मालिकेचा विषय फार वेगळा आहे.माणुस जन्माने गुन्हेगार नसतो तर परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते.मोहाच्या भरात जरी एखादा गुन्हा करुन तो जेलमधे गेला तरी माणुस म्हणुन त्याचा मुळ स्वभाव बदलत नाही.जेलमधे असे अनेक बंदि आहेत,की ज्यांनी संधी मिळताच दुसर्यांना मदत करुन आपले माणुसपण सिध्द केले.अशा बंदिंच्या कथा या मालिकेत आहेत.गुन्हेगार त्याची सजा भोगुन सुटला की समाजाने त्याला समाजाने स्वीकारले पाहिजे.त्यामुळे समाजातील गुन्हेगारी कमी व्हायला मदत होयील.या भूमिकेतुन या मालिकेची निमिती केली आहे.या मालिकेचे लेखक वसंत बंदावणे यांनी जेलमधे राहुन ही मालिका लिहीली आहे. त्यामुळे माध्यमांत हा विषय एवढ्या सखोलपणे पहिल्यांदाच येत आहे.म्हणुन ही बंदिशाळा मालिका आपण दर मंगळवारी ५.३० वाजता दूरदशर्नच्या सह्यादर्ी वाहिनीवर पाहिलीच पाहिजे.
— वसंत रेवजी बंदावणे उर्फ बी.बंडू
Leave a Reply