मध्य प्रदेश उज्जैन येथे प्रसिद्ध महाकाळेश्वर मंदिराच्या शेजारी बडा गणेश हे मंदिर आहे. गणेशाची ही मूर्ती आधुनिक असून ती मातीच्या रांजणांनी, तलरंगात बनविलेली आहे. मूर्ती अकरा फूट उंचीची असून त्याच्या शेजारी सिद्धी-बुद्धीच्या मूर्ती आहेत. इंदूर येथील बडे गणेशाची मूर्ती बारा फूट उंचीची व विटांची आहे. तिला वरून तलरंग दिलेला आहे. निष्कलंकेश्वर, नागदा, पगारा येथे गणेश मंदिरे आहेत. येथील ओंकारेश्वराच्या मंदिरात पंचमुखी गणेशाची मूर्ती आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply