बदलते भाव
कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते
राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते….१
देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले
अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले….२
देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी
केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी…३
जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून
भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून…४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply