‘भारताला स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे मिळाले, गांधीजींमुळे नव्हे,‘ असे उथळ विधान जनसंघटनेच्या एका नेत्याकडून अपेक्षित नव्हते. सुदर्शनजी पुढे असेही म्हणतात की, ‘इंग्रज देश सोडून गेले, कारण त्यांचा सैन्यदलावरील विश्वास उडाला होता. आणि एवढा मोठा देश आपल्या ताब्यात ठेवणे त्यांना अशक्य वाटले.‘ शेवटचे विधान मात्र सत्य आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्य याच्यामुळे वा त्याच्यामुळे मिळाले, असे त्याचे सरळसोट उत्तर नाही व तसे ते नसणार, हे सांगावे लागेल असे कधी वाटले नव्हते. परंतु सुदर्शनजींनीच असे म्हटल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबी लक्षात आणून देणे भाग आहे.
इंग्रजांनी ज्याला ‘शिपायांचे बंड‘ म्हटले, त्या १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर सैन्यावर इंग्रजांचा पूर्ण विश्वास कधीच नव्हता. म्हणूनच अधिकाराची पदे फक्त गोर्या साहेबांची मक्तेदारी होती. शिवाय ब्रिटिशांची गुप्तहेर संघटनाही होती व ती सामान्य ‘लअर्थात् कम्युनिस्ट पक्षाने चुका केल्या नाहीत असे नाही. चुका म्हणण्यापेक्षा त्याला गोंधळ घालणे म्हणणे जास्त सयुत्ति*क ठरेल. युद्धाला विरोध केल्याने सर्व कम्युनिस्ट पुढारी राजस्थानातील देवळी येथे बंदी होते. आणि जून १९४१ साली सोव्हिएत युनियन युद्धात ओढले गेले व ते लोकयुद्ध ठरले, हा इतिहास सर्वज्ञात आहे. ब्रिटिश गुप्त कागदपत्रांवरून असे दिसते की, लोकयुद्ध हा अर्धाच भाग लोकांपर्यंत पोचला. कम्युनिस्टांच्या प्रत्येक जाहीर सभेचे रिपोर्ट आर्काइव्हमध्ये आहेत. त्यांत नमूद केले आहे की, हे सगळे वक्ते पहिले वाक्य ‘युद्धप्रयत्नांना मदत करा‘ व दुसरे वाक्य ‘काँग्रेसच्या पुढार्यांना सोडा‘ असे म्हणतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. युद्धप्रयत्नांसाठी दर महिन्याला एम. एन. रॉय यांना पैसे दिले गेले- ३० ते ३७ हजारांपर्यंत. परंतु कम्युनिस्टांना फक्त बदनामी व अविश्वासाचे धनी बनायला लागले. याच ब्रिटिश कागदपत्रांवरून दिसते की, कम्युनिस्टांच्या भावना व बुद्धी यांत अनेकदा गोंधळ
उडाला. परंतु त्यांच्या आकलनाप्रमाणे देशावर,
देशातील जनतेवर त्यांचे प्रेम होते व कामगारांत जाणीव-जागृती करण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.
आर्काइव्हच्या कागदपत्रांत सापडलेली आणखी एक गोष्ट सांगून विवेचन पुढे नेते. १९२९ या वर्षात ब्रिटिश सरकारला वाटले की, कम्युनिस्टांवर नजर ठेवायला बँकांना सांगावे. सगळ्या बँका तेव्हा ब्रिटिश किवा युरोपीय होत्या. तेव्हा त्या या गोष्टीला तयार झाल्या. परंतु कम्युनिस्टांच्या नावांची यादी त्यांनी मागितली. त्या यादीमध्ये कम्युनिस्ट व छुपे कम्युनिस्ट असे दोन विभाग आहेत. त्यात भावी – Potential- कम्युनिस्टांच्या यादीत नेहरूंप्रमाणेच डॉ. हेडगेवारांचेही नाव आहे. खरं तर १९२६ सालीच रा. स्व. संघाची स्थापना डॉक्टरांनी केली होती. रा. स्व. संघावर नेहमी आरोप केला जातो की, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान काहीच नव्हते. संघटना म्हणून त्यांचा सहभाग नव्हता हे खरे असले तरी देशप्रेमाची जी जाणीव, जी जागृती त्यांनी केली होती, त्यामुळे कित्येक तरुण स्वातंत्र्य चळवळीत या ना त्या मार्गाने सामील झालेच. गांधीजींच्या नेतृत्वाखालील चळवळीत सामील न झालेले अनेक गट होते. त्यांना देशाविषयी प्रेम होतेच. माझाच मार्ग सच्चा, बाकीच्यांचे मार्ग माझ्या मते चुकीचे म्हणून ते देशद्रोही, असे म्हणणे मूर्खपणाचे अशासाठी की, नसत्या वादात आपण अकारण गुंतून पडतो. इतिहासापासून धडा शिकून पुढे जायचे असते, इतिहासात गुंतून पडायचे नसते. आपला इतिहास विसरणार्याला भविष्यकाळ नसतो, अशी एक म्हण आहे. त्याचप्रमाणे इतिहासातच गुंतून पडणार्यालाही भविष्यकाळ नसतो.
माणसं कुठल्या चळवळीकडे ओढली जातात, हे परिस्थितीजन्यही असते. उदा. सुभाषबाबूंच्या सैन्यात जपान्यांनी पकडलेले ब्रिटिश सैन्यातील भारतीय जवान, कॅ. लक्ष्मींसारखी त्यावेळी सिगापूरला डॉक्टरी व्यवसाय करणारी तरुणी असे सगळे होते. पुढे कॅ. लक्ष्मी कम्युनिस्ट झाल्या. सुभाषबाबूंचे अनुयायीत्व पत्करताना त्यांनी आयडियोलॉजीचा विचार केला नव्हता. सुभाषबाबूंना विरोध करणारे त्यांना जपानी- जर्मनांशी हातमिळवणी करण्यातले धोके दाखवून देत होते, तरीही त्यांना ‘देशद्रोही‘ म्हणत नव्हते. चंद्रशेखर आझाद, भगतसिग किवा काकोरींवर हल्ला करणार्या कल्पना दत्त- जोशी या आपणाला तेव्हा ते सर्व रोमँटिक वाटून केल्याची कबुली देतात. त्यांच्या मार्गाविषयी चर्चा होऊ शकते, पण त्यांना चटकन् ‘देशद्रोही‘ अशी लेबलं लावणं- सुशिक्षित, सुजाण नागरिकांनी टाळावे. तीच गोष्ट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी. स्वातंत्र्यवीर सावरकर कधीकाळी आपल्याला स्फूर्ती देऊन गेले की नाही? याविषयी आपल्या मनाला विचारावे आणि त्यांनी काही बाबतीत खाल्लेली कच- हा विषय विद्यापीठीय चर्चेसाठी राखून ठेवावा. तांत्रिकदृष्ट्या शिवाजीमहाराज उच्चकुलीन होते किवा नव्हते, हा प्रश्नच गैरलागू आहे. ‘दैवायत्तं कुल जन्म…‘ म्हणून कौतुक करणार्या समाजाने शिवाजीमहाराजांचे कुळ, स्वातंत्र्यवीरांचा दुखरा भाग- यावर भावना भडकवू नयेत.
फक्त माणसंच स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतात, सुसंस्कृतीकडे वाटचाल करू शकतात, माणुसकी विकसित करू शकतात. कितीतरी देशांतील हुकूमशाही राजवटींनी जनतेने विचार करू नये, आपल्या हुकूमांप्रमाणे वागावे म्हणून प्रयत्न केले. तरीही त्या ठिकाणी माणूस विद्रोही विचार करत राहिलाच. संधी मिळताच या राजवटी त्याने नष्ट केल्या. तेव्हा आम्ही सांगू तेच खरे, तुम्ही तसाच विचार करा, हे म्हणणे म्हणजे खडकावर बी फेकत राहण्यासारखे व्यर्थ आहे. मला वाटते की, त्यामागे ही कारणे आहेत. तुम्ही स्वतःच्या अनुभवांशी ताडून बघा व स्वतः निर्णय घ्या, हे म्हणणे जास्त प्रगल्भपणाचे व समाज प्रौढ होण्याच्या दृष्टीने टाकलेले योग्य पाऊल ठरेल. रा. स्व. संघाला हे कुठेतरी पटत असेलही, म्हणूनच कम्युनिस्ट विचारांशी जवळीक असणार्या समाजवादी सानेगुरुजींचे ‘बलसागर भारत होवो…‘ हे गीत संघाने आपले मानले आहे.
— भालचंद्र हडगे
Leave a Reply