एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते अस म्हणतात
आजकाल त्या स्त्रीच नाव आहे बाईक …
असते ज्याच्याकडे हल्ली बाईक
त्याला लवकर मिळते वाईफ…
बाईक पाहून हल्ली मुली
मुलांच्या प्रेमात पडतात….
लग्न झाल्यावर नोकरी करून त्याच्या
त्याच बाईकच्या कर्जाचे हप्ते फेडतात …
बाईक वरून फिरता याव जगभर म्हणून
मुलगी हल्ली बाईक वाल्याशी लग्न करते
आणि लग्न झाल्यावर त्याच बाईक वरून
राहायला जागा शोधत दारोदार भटकते …
बापाच्या पैशावर हल्ली
बाईक कोणीही घेतो
पण त्याच बाईक मद्धे स्वत: च्या पैशाने
पेट्रोल भरण्यासाठी अक्कल घ्यायला मात्र विसरतो……….
या बाईक मुळे कित्येकांची आयुष्ये
वाया गेलेत आणि जाता आहेत
बाईक मुळे पोरी पटतात अशा ठाम
मता पर्यंत कित्येक पोर पोहचली आहेत …..
गाडी घेण्याची ऐपत असणारेही
कित्येकजण रस्त्यावरून चालतात
पण खिशात दमडी नसतानाही
हल्ली काही बाईक वाले हवेत उडतात …
बाईक सह हवेत उडणाऱ्याच्या
आजच्या मुली प्रेमात पडतात
आणि मग आयुष्यभर त्याच्या सोबत
त्याच्या बाईक सारख्याच फरफटत जात राहतात ….
बाईक न पाहता हल्ली हेल्मेट पाहून
तरुणींनी प्रेमात पडायला हव
बाईक नावाच्या सवतीच्या नादी न लागता
विचार करूनच प्रेमात पडायला हव…..
कवी – निलेश बामणे
Leave a Reply