इंग्लंड देशातील राजधानीच्या शहरातील जगप्रसिध्द घडयाळाचा मनोरा सर्वानाच ऐकून परिचित आहे. लंडन येथील वेस्टमिनिस्टर भागातील पार्लमेंट इमारतीच्या ईशान्य दिशेला असणार्या मनोर्यामध्ये मोठे घडयाळ बसविले आहे. बिग बेन हे लंडन शहराच्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यामधील एक ऐतिहासिक घड्याळ आहे. हे घड्याळ एलिझाबेथ टॉवरवर लावले असून अनेकदा ह्या टॉवरलाच बिग बेन असे संबोधले जाते. बिग बेन घड्याळ चारही बाजूंनी वेळ दाखवते. इ.स. १८५८ साली बांधून पूर्ण झालेला हा मनोरा लंडन व इंग्लंडमधील सर्वात ठळक खुणांपैकी एक असून अनेकदा चित्रपटांमध्ये लंडनची ओळख करून देण्याकरता वापरला जातो.
वेस्टमिनिस्टरच्या जुन्या राजवाडयाला १८३४ मध्ये आग लागली. नंतर नवीन राजवाडा बांधतांना त्यामध्ये क्लॉक टॉवरची रचना केली गेली. व्हिक्टोरियन गॉथिक पध्दतीने या मनोर्याचे बांधकाम केले गेले असून, त्याची उंची ९६.३ मीटर आहे. ६१ मीटर उंचीपर्यंत असलेला मनोरा विटांनी बांधलेला असून, उर्वरित मनोरा लोखंडी चौकटीत केलेला आहे. चारही बाजूंची घडयाळे ५५ मीटर उंचीवर असून, या घडयाळांची रचना १८५४ मध्ये केली गेली. मनोर्याचे बांधकाम १८५८ साली पूर्ण झाले व हे घडयाळ ७ सप्टेंबर १८५९ रोजी प्रत्यक्षात सुरु झाले.
या बिगबेन घडयाळातील तासकाटा ९ फूट लांब व मिनिटकाटा १४ फूट लांब आहे. बिगबेन ही मुख्य घंटा १३ टन एवढया वजनाची असून २.२ मीटर उंच आहे. अॅ लेन ब्रॅडली या क्लॉक टॉवरचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी लंडनमधील बिगबेन क्लॉक टॉवर हेच सर्वात मोठे घडयाळ होते. परंतु अॅलेन ब्रॅडलीमध्ये घंटा बसविलेल्या नाहित आणि फक्त याच कारणामुळे आजही चारही दिशांना तोंड असणारे तसेच घंटानाद करणारे जगातील सर्वात मोठे घडयाळ म्हणून बिग बेन क्लॉकच ओळखले जाते. लंडनमधील हे आश्चर्यकारक घडयाळ पाहण्यास परदेशी पाहुण्यांची प्रचंड वर्दळ असते.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply