शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एफएम रेडिओवर मराठी गाणी ऐकविली जात असून मराठी संगीतकार, गीतकार यांना प्रोत्साहित करणार्या बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डस् सारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. बिग एफएम
आणि बिग लाईव्ह रेडिओ वाहिन्यांनी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डस् कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यावतीने त्यांच्या कुटूंबियांनी जीवनगौरव पुरस्काराचा स्वीकार केला. संगीतकार संदिप खरे, अनिल मोहिले, गीतकार सलील कुलकर्णी आदींना मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले.
— बातमीदार
Leave a Reply