नवीन लेखन...

बी.पी. आणि शुगर

चांगल्या असो की…
वाईट असो..
घडणाऱ्या गोष्टी घडत असतात …!!
लहान मुले मोठी होतांना…
पडत पडत घडत असतात…!!

डोक्याला जास्त
ताण करून घ्यायचा नाही…
आणि
सारखा सारखा बी.पी.
वाढवुन घ्यायचा नाही …!!

मुलं अभ्यास करत नाहीत
आपण समजून सांगावं…….!!
घरातलं काम करत नाहीत
त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं……!!

भविष्यात त्याचं कसं होईल…?
याची जास्त काळजी
करायची नाही….!!
सारखा सारखा आपण आपला
बी.पी. वाढवून घ्यायचा नाही….!!

तुम्हाला वाटतं पोरींन ….
स्वयंपाकात लक्ष घालावं
भाजी नाहीतर नाही ….
पिठलं तरी हालवावं ….!!

लाडक्या चिरंजीवाने
मोबाईलशी कमी खेळावं …..
आल्या गेल्या पाहुण्यांशी
दोन शब्द तरी बोलावं …!!

पोरगं मात्र अजिबात
थोबाड वर करत नाही…
तरी सुद्धा आपण आपली
शुगर लेव्हल मुळीच वाढू
द्यायची नाही…!!

ऑफिस असो घर असो
कुणीच कुणाचं ऐकत नसतं…

ज्याला जसं वाटेल तसं
प्रत्येकजण वागत असतो…!!

आपण मात्र उगीचच
फुकटचे सल्ले देत असतो
समोरच्या माणसावर त्याचा काहीच
परिणाम होत नसतो.

छातीवर हात ठेऊन सांगा

तुम्ही काळजी केली म्हणून
कोणते कोणते प्रश्न सुटले..?

नाहीतरी तुमची मुलं तुम्हाला
विचारणारच आहे…
तुम्ही आमच्यासाठी काय केले ?

सरते शेवटी कोणतीच गोष्ट
मनाला लावून घ्यायची नाही
बी.पी. आणि शुगर सुद्धा
अजिबात वाढू द्यायची नाही

मरण यायच्या आधी मात्र थोडं
स्वतःसाठी जगून जायचे …
सगळ्या सोबत असूनही
थोडं बाजूला होऊन जायचे…!!

आपलं कोणी ऐकत नसतं
त्यावेळी जास्त बोलू नये …
त्यांचं ते बघून घेतील
जास्त ओझ ं उचलू नये ….!!

बी.पी. आणि शुगर सुद्धा
Tension मुळे होत असतात…
गोळ्या, औषधं घेतले की
बिचारे गुपचप बसत असतात….!!

काहींच्या बाबतीत ती
वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते…
रजिस्ट्री नाही केली तरी
तिकडून इकडे येत असते….!!

चालत जावं , फिरत जावं ..
डॉक्टर सांगतील ते ऐकत जावं…!!
योग, प्राणायाम करत करत
आनंदाने लढत राहावं…!!

आपल्या हार्टच्या ECG ला
आपण बिघडू द्यायचं नाही…
” बी.पी.” आणि ” शुगर ” ला
जास्त वाढू द्यायचं नाही ……!!!

— डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716

Avatar
About डॉ. गौरी पाटील 11 Articles
डॉ. गौरी पाटील या बोरीवली, मुंबई येथील निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत.

1 Comment on बी.पी. आणि शुगर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..