हे फोटो काढण्यास क्ष किरण तज्ञांना आधी भेटणे जरुरीचे आहे कारण यासाठी पुन्हा उपाशी पोटी जावे लागते. व आदल्या दिवशी जुलाबाचे औषधही घ्यावे लागते. जर बेरियम टेस्ट फक्त पोटासाठी (स्टमक, ड्युओडेनम) असले तर फक्त १५ मिनिटेच लागतात व यात स्पेशल डबल कॉंन्ट्रास्ट स्टडी म्हणजे हवा व बेरियम मिश्रण करुन पोटाचे अल्सरसाठी फोटो काढले जातात.
यासाठी प्रथम काळोखात स्क्रिनिंग करुन पोटात दिलेले औषध स्पष्ट बघितले जाते व योग्य अॅंगलमध्ये एक्स-रे काढले जातात. हे औषध अत्यंत सुरक्षित असते. ते मातकट चवीचे असले तरी कडू नसते. आज या औषधाचे वेगवेगळे फ्लेवर्स उपलब्ध आहेत.
रुग्णाला नळी घालून एन्डोस्कोपीचा त्रास होणार असेल तर हे एक्स-रे, अल्सरचे निदान करण्यास सोपे जातात. या एक्स-रेची क्षमता ९९ टक्के इतकी असते. शिवाय एन्डोस्कोपीमध्ये पोट आतून बघितले जाते त्यामुळे बाहेरील गोष्टी दिसत नाहीत. उदा. पोटाचा आकार, अन्ननलिका फुगलेली आहे की नाही हेही आतून कसे सांगणार ?
पुढील महत्वाचा भाग म्हणजे बेरियम फॉलोथ्रु. यात रुग्णाला बेरियम पिण्यास देऊन क्लिनिकमध्ये तीन तास उजव्या कुशीला झोपवले जाते व औषध जसजसे पुढे जाईल तसतसे पाचसहा फोटो काढून आतड्याचा तपास केला जातो. यात आतड्याला सूज आहे का किंवा रुग्णाला टी.बी. आहे का, जंत आहेत का, हेन दिसून येते. हे झाले पोटाचे साधे व स्पेशल एक्स-रे पुढील लेखात बेरियम स्वॅलो व एनिमा याबद्दल बघू.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply