बेळगाव महानगरपालिका बरखास्त करण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा घडवून आणू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
श्री. पवार यांचे गुरुवारी दुपारी दोन वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी बेळगावहून आलेल्या शिष्टमंडळाने श्री. पवार यांना निवेदन दिले. यावेळी कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, आमदार मधुकर पिचड, आमदार के. पी. पाटील, महापौर कादंबरी कवाळे, सांगलीचे महापौर इंद्रीस नायकवाडी, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी कर्नाटक राज्य शासनाने महानगरपालिका बरखास्त करुन अन्याय केला असल्याचे श्री. पवार यांना सांगितले. याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे रविवारी (दि. ८ जुलै) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच विधीमंडळातील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा घडवून आणण्यात येईल. त्यावेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी यावे, असे श्री. पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
— मराठीसृष्टी
Leave a Reply