जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर १९७२ रोजी झाला. पूर्वी एक चांगला मॉडेल उत्कृष्ट अभिनेता होऊ शकत नाही, असे बॉलिवूडमध्ये म्हटले जाते असे. मात्र जॉनने यशस्वी मॉडेलसोबतच स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणूनही सिद्ध केले आहे. २००३ मध्ये ‘जिस्म’ या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या जॉनने पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार आपल्या नावी केला होता. यशस्वी मॉडेल, अभिनेता आणि पिळदार शरीरयष्टी असलेला जॉन बाइक्ससाठी क्रेजी आहे. त्याच्याकडे बाइक्सचे मोठे कलेक्शन आहे. जॉनला JA या स्वतःच्या ब्रॅण्डची जीन्स परिधान करणे पसंत आहे. याशिवाय तो अरमानी ब्रॅण्ड्सचे शर्ट्स वापरतो. या ब्रॅण्ड्सच्या शर्टची किंमत साठ हजारांपासून सुरु होते. डिझायनर नरेंद्र कुमार अहमद यांचे कट सूट्स तो परिधान करतो. याशिवाय रॉकी एससुद्धा त्याचे आवडते डिझायनर आहे.
जॉनचा फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ असून फुटबॉलपटू होण्याचे त्याचे स्वप्न होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply