नवीन लेखन...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लन

पूनम ढिल्लन १९७७ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकून प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९६२ रोजी झाला. असे म्हटले जाते, की एका मॅगझिनमध्ये पूनम यांचे छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना ‘त्रिशुल’ सिनेमाची ऑफर दिली होती. सुरुवातीला पूनम यांची ऑफर नाकारली होती, मात्र नंतर त्यांनी तो सिनेमा स्वीकारला होता. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे आयुष्यच पालटून गेले. ‘त्रिशुल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ‘त्रिशुल’ या सुपरहिट सिनेमाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा करणा-या पूनम यांची राजेश खन्नांसोबत ऑन स्क्रिन जोडी जमली होती. दोघांनी ‘निशान’, ‘दर्द’, ‘आवाम’, ‘जय शिव शंकर’, ‘रेड रोज’), ‘जमाना’ या सिनेमांमध्ये एकत्र काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली होती. १९८८ मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठाकरियासोबत लग्न केले. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. पूनम यांना पाहताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले होते. पूनमकडे आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर जोपर्यंत त्यांचा होकार आला नाही, तोपर्यंत दररोज ते त्यांना एक गुलाबाचे फूल पाठवत होते. अशोक यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पूनम यांनी सिनेमात काम करणे कमी केले होते. १९९२ मध्ये आलेल्या ‘विरोधी’ या सिनेमानंतर जवळजवळ पाच वर्षे पूनम यांनी इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला होता. १९९७ मध्ये ‘जुदाई’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..