![p-33491-nadira](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/02/p-33491-nadira.jpeg)
भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी मा.नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला. त्याकाळी अभिनेत्री सोज्वळ भूमिका साकारायला प्राधान्य देत होत्या,मात्र नादिरा यांनी बोल्ड आणि नकारात्मक भूमिका साकारणे पसंत केले. ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. नादिरा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, भारत भूषण, राज कपूर, प्रदीप कुमार या सर्व दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले. ‘आन’ या सिनेमात नादिरा दिलीप कुमार यांच्याबरोबर झळकल्या. तर ‘पॉकेटमार’मध्ये त्यांचे हीरो होते देव आनंद. राज कपूर यांच्या ‘श्री 420’ मध्ये नादिरा यांनी माया हे वेगळ्या धाटणीचे पात्र साकारले होते. अशोक कुमार यांच्यासह नगमा, शम्मी कपूर यांच्यासह सिपहसालर, प्रदीप कुमार यांच्यासह ‘पुलिस’ आणि भारत भूषणसह ‘ग्यारह हजार लडकियां’ या सिनेमांत नादिरा यांनी काम केले. 1954 साली नादिरा यांनी गायक-अभिनेता तलत महमूदसह ‘डाक बाबू’ आणि ‘वारिस’ या दोन सिनेमांत काम केले. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमांत नादिरा यांनी तलत महमूदसह गाणीसुद्धा गायली. तब्बल तीस वर्षे नादिरा यांनी सिनेसृष्टीत काम केले. नादिरा यांनी इस्माइल मर्चंट यांच्या ‘काटन मॅरी’ (1999) या हॉलिवूड सिनेमातसुद्धा अभिनय केला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply