जयाप्रदा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलगू सिनेमाद्वारे केली होती. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी झाली.वयाच्या १४ व्या वर्षी जयाप्रदा यांना आपल्या शाळेतील डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नृत्य बघून एक दिग्दर्शक प्रभावित झाले होते. त्यांनी भूमिकोसम या सिनेमात त्यांना नृत्य सादर करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर आईवडिलांच्या म्हणण्यावरुन त्यांनी ही ऑफर स्वीकारली. या सिनेमासाठी जयाप्रदा यांना केवळ १० रुपये मानधन मिळाले होते. १९७९ सालीआलेल्या ‘श्री श्री मुवा’ या सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘सरगम’ या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे जयाप्रदा यांना एका रात्रीत स्टारडम मिळाले. त्यानंतर मात्र रिलीज झालेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. कामचोर या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना नशीबाने साथ दिली. हा सिनेमा यशस्वी ठरला. बॉलिवूड सिनेमांमुळे मा.जयाप्रदा यांना खरी ओळख प्राप्त झाली. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये जयाप्रदा यांची गणना व्हायची. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी चांगली गाजली. मा.जयाप्रदा यांनी विवाहित श्रीकांत नाहटा नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. श्रीकांत नाहटा हे निर्माते आहेत. या लग्नावरुन बराच वाददेखील निर्माण झाला होता. सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या जयाप्रदा यांचा राजकारणातील प्रवेशदेखील चर्चेत राहिला. सिनेमासोबतच राजकारणातदेखील त्यांनी नाव कमावले. तेलगू देशम पक्षाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयाप्रदा यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ARKnsS541g8
Leave a Reply