वयाच्या ३५ नंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण पुरुष-स्त्रियांमध्ये हळूहळू कमी होते; परंतु काही स्त्रियांमध्ये एकदम जोरात घसरु लागते व अशा स्त्रियांना कंबरदुखी, पाठदुखी व थोड्याशा दुखापतीमध्ये फ्रॅक्चर होणे असे आजार भेडसावू लागतात. म्हणून साधारण ४० नंतर प्रत्येक व कंबरदुखी असलेल्या सर्व पुरुषांनी बी.डी.एम. हा पास करुन, आपल्या हाडांची घनता कशी आहे, हे अधूनमधून बघितले पाहिजे. ज्या स्त्रियांना व पुरुषांना डायबेटिस, सतत स्टिरॉईडस् घेण्याची वेळ येत असेल अथवा सतत दारु पिण्याचे व्यसन असेल व ज्यांना व्यायामाचा अभाव असेल किंवा थायरॉईड व पॅराथायरॉईड हार्मोन्स कमतरता असेल अशांनी तर हा तपास केलाच पाहिजे.हाडांची घनता ढासळ्यावर मांडी एकदम फ्रॅक्चर होणे किंवा थोड्याशा कारणाने मणका दबला जाणे किंवा हळूहळू कुबड येणे होते.
तीन प्रकारचे बी.डी.एम. आज उपलब्ध आहेत; अल्ट्रासाऊंड, डेग्झा, क्यू-सी.टी., अल्ट्रासाऊंड बी.डी.एम. टाचांचे केले जातात व याची अचूकता कमी आहे. सर्वात जास्त वापरात आणले जाते हे डेग्झामशिन, ज्यात “क्ष” किरणे वापरली जातात. सगळ्यात महत्वाचे हाड म्हणजे कंबरेचा मणका याचा डेग्झा होणे जरुरी आहे; या तपासात झेड स्कोर व टी स्कोर असतात व सर्वात महत्वाचा टी-स्कोर ज्यात तरुण माणसांतील कॅल्शिअमच्या प्रमाणाशी पेशंटच्या हाडातील कॅल्शिअम (घनता) याची तुलना केलेली असते. मायनस वनच्या खाली टी-स्कोर झाला की, कॅल्शिअम कमतरता दर्शवते, तर मायनस २.५ च्या खाली ऑस्टिओपोरॉसिस म्हणजे कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन “डी” ची कमतरता दिसून येते. सर्वात अचूक घनतादर्शक म्हणजे क्यू सी.टी. ज्यामध्ये मणक्यांचे कॉन्टिटेटिव्ह अॅनॉलिसीस मिलीग्रॅम पर सी.सी. होते व ज्यामध्ये हाडांचे आवरण व हाडांच्या मधल्या भागांचे वेगवेगळे विश्लेषण मिळते जे ट्रीटमेन्टच्या दृष्टीने महत्वाचे असते “क्ष” किरणांचा डोस फक्त १० टक्के जास्त असतो व खर्च ७०० रुपयापर्यंत असतो. साध्या हाडाचा डेग्झा ४००-५०० रुपये, तर मणक्यांचा डेग्झा २,५०० रुपये होतो.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply