बोलली नाहीस तू अन् भावना कळली मला
फक्त तू मिटलेस डोळे प्रार्थना कळली मला
चालण्याआधी जराशी ठेच खावी लागते
रीत ही कळली मला रे जीवना कळली मला
एकही तक्रार नाही हे सुखा माझी अता
वेदनेला मी कळालो, वेदना कळली मला
स्पर्श तू करताच कळले प्रेम हे असते कसे
जाळण्यासाठीच असते वासना कळली मला
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply