नवीन लेखन...

भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला

(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि  तिच्या चाह्त्यांनीच  तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )
ज्ञान प्राप्तीसाठी भगवान बुद्ध कठोर तपस्या करत होते. उग्र तपस्येमुळे त्यांचे शरीर हाडांचे पिंजर झाले.  पण त्यांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. वीणेची झंकार ऐकून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. सुजाताच्या हातची खीर प्रश्न करून ते ध्यानमग्न झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाले.  ज्ञानप्राप्ती साठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शरीर हे गरजेचेच. म्हणूनच म्हंटले आहे, ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनं’. भगवान बुद्धाचे शिष्य प्रज्ञावान होते, तपस्या अर्धवट सोडली म्हणून त्यांनी आपल्या गुरुचा बहिष्कार नाही केला,अपितु गुरु कडून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रकाश  जगभर पसरविला. असो.
राजू गाईडच्या अंगावर भगवे वस्त्र पाहून, भोळ्या-भाबड्या ग्रामस्थांनी त्याला महात्मा समजून त्याचे स्वागत केले. शहरी जीवनातले छक्के-पंजे जाणणारा राजू , ग्रामस्थांच्या नजरेत एक ज्ञानी महात्मा ठरला.  दूर पर्यंत त्याची प्रसिद्धी पोहचली. राजू मुफ्तचा  माल उडवीत मजेत जगत होता. पण ‘जगात काहीच मुफ्तमध्ये मिळत नाही, एक दिवस त्याची किंमत मोजावीच लागते’. गावात दुष्काळ पडला, भयंकर दुष्काळ. गावात पूर्वी हि एकदा असा असा भयंकर दुष्काळ पडला होता, तेंव्हा एका महात्म्याने इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी उग्र तपस्या केली होती.  आपले महात्मापण टिकविण्यासाठी राजूला हि तपस्येला बसावे लागले. भुकेने त्याचा जीव कासावीस झाला, पळून जाण्याची इच्छा झाली. पण ज्या प्रमाणे कोळीच्या जाळ्यात अटकलेला कीटक तडफडून मरतो, तसेच आपल्याच महात्म्या रुपी प्रभामंडळात अटकलेला राजू हि उपासमार होऊन मरतो. सिनेमाच्या शेवटी पाऊस पडतो. पण  प्रत्यक्षात असे होत नाही. कित्येक बळीराजांनी आत्महत्या केली तरी इंद्र्देवाचे  हृदय पाझरताना कधी बघितले नाही. कुणी तपस्या केली कि इंद्रदेव प्रसन्न होत नाही, त्या साठी गोवर्धन पर्वतच उचलावे लागते.

आपले निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ईरोम शर्मिला हि १६ वर्ष आधी उपोषणाला बसली. तिला उपोषणाची प्रेरणा महात्मा गांधींपासून मिळाली होती. पण तिला एक माहित नव्हते. महात्मा गांधी एक चतुर राजनेता होते. उपोषण त्यांचे एक शस्त्र होते.  या उपोषण रुपी शस्त्राचा किती आणि कसा वापर करायचा याची त्यांना चांगली कल्पना होती. त्यांनी या शस्राचा वापर नेहमीच योग्य रीतीने केला आणि आपले हेतू साध्य केले. पण ईरोम ठरली भोळी-भाबडी. तिचा वापर करणार्यांनी तिच्या भोवती एक प्रभामंडळ तैयार केले.  ती त्या प्रभामंडळात अटकली.

आता एकच प्रश्न डोळ्यांसमोर येतो. कुणी १६ वर्ष उपाशी राहू शकतो का? उत्तर नाही. सरकारने तिला इस्पितळात बंदिस्त ठेवले होते.  तोंडाच्या जागी नाकातून तिला अन्नद्रव्य दिले जात होते.(तांदूळ, भाज्या, डाळ इत्यादी). रुग्णांसाठी असलेली सुविधा तिच्यावर वापरल्या जात होत्या. अर्थात ती उपाशी नव्हती. तिला जिवंत ठेवण्यासाठी सरकारचा भरपूर पैसा हि बरबाद झाला.  तिच्या उपोषणातला फोलपणा निश्चित ईरोमला  हि कळत असेलच.  पण ती हि राजू गाईडप्रमाणे स्वत:निर्मित प्रभामंडळ रुपी जाळ्यात अटकलेली होती आणि तिला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नव्हता. इस्पितळात राहून नाकाने अन्नद्रव्य ग्रहण करण्या अतिरिक्त ती काहीही करू शकत नव्हती. शेवटी हिम्मत करून तिने आपल्या भोवती असलेले प्रभामंडळ तोडले. नाकाच्या जागी तोंडातून जेवण घेण्याचा निश्चय केला. पण घरी आणि गावात तिचे कुणीच स्वागत  केले नाही. कारण तिचा वापर करणारे तिच्या विरुद्ध झाले होते .  तरीही मी तिची हिम्मतीची प्रशंसा करेल. अन्यथा असेच तडफडत तिचे जीवन व्यर्थ गेले असते.

भगवान बुद्धाने देशभर भ्रमण करून, आपल्या शिष्यांना दूरदेशी पाठवून, धर्माचा प्रसार केला होता.   ईरोम शर्मिला हि या  १६ वर्षांत देशभर फिरून ASFPA (अफ्सपा) विरुद्ध जनजागृती करू शकत होती.   कदाचित  तिच्या प्रयत्नांना यश हि आले असते.   १६ वर्ष तिने व्यर्थ घालविले.   पण म्हणतात ना ‘देर आये दुरुस्त आये‘.  भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला  आहे.  तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे.

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..