मोर पिसांचा मुकुट मस्तकी, धरली मुरली अधरावरी
मोहवी दर्शन तव श्रीहरी ।।धृ।।
नंद यशोदेचा तू तान्हा प्राणसखा गोकुळीचा कान्हा
मोहन राधा रमण मुरारी मोहवी ।।१।।
गोपबालका सवे घेऊनी गोधन नेसी वनी उपवनी
चोरीसी नवनीत गवळ्यांघरी मोहवी ।।२।।
तुज भवती त्या सकल गोपिका गोफ गुंफिला सवे राधिका
रास तो रंगे यमुना तिरी मोहवी ।।३।।
पांडवांचा तूची त्राता द्रौपदीचा होसी भ्राता
सारथी पार्थाचा गिरीधारी मोहवी ।।४।।
गीता उपदेशुनी अर्जुना ज्ञान काथिले जन उद्धरणा
सुदर्शन सदैव फिरते करी मोहवी ।।५।।
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply