महाराष्टातील प्रसिद्ध पंढरपूर येथील इस्कॉन (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) मंदीराचे प्रमुख परमपूज्य लोकनाथ स्वामी यांचे अहमदनगर येथील इस्कॉनच्या मंदीरात गेल्या काही दिवसांपूर्वी साप्ताहिक सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. लक्ष्मीनारायण प्रभू यांच्या विनंतीला मान देऊन नगरला आलेले लोकनाथस्वामी उपस्थित कृष्णभक्तांना संबोधित करताना म्हणाले, की मनुष्य भौतिक गुणांनी
लिप्त झालेला असतो, कृष्णभक्त सर्व पापांपासून मुक्त असतो, तर सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्ण शुद्धतम व्यक्ती आहेत. सर्व प्रकारच्या पाप आणि वासनेतून मुक्त झाल्याशिवाय मनुष्य कृष्णभक्त होऊ शकत नाही. कधी कधी मनुष्याने पाप करणे थांबविले तरी वासना शिल्लक राहते. मात्र वारंवार शुद्ध भक्तांच्या सत्संगात आल्याने तो शुद्ध कृष्णभक्त बनतो. सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांमध्ये अशुद्ध भावाचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते सत्व, रज आणि तम या भौतिक गुणांच्या अतित अर्थात पलीकडे असतात. भागवत धर्माचा प्रसार करताना माझ्या मते, किंवा मला असे वाटते या शब्दांना काहीच किंमत नाही. श्रीमद्भगवतगीता जशी आहे तशी समजून घेण्यासाठी मनुष्याने सर्वश्रेष्ठ परंपरेतील अधिकारी व्यक्तींकडून श्रवण करणे आवश्यक आहे. भागवत धर्माचा प्रसार करताना स्वतःचे मत लादणे ही शुद्ध फसवणूक व मोठा अपराध आहे. इस्कॉनमध्ये येणार्या भक्ताने जुगार, मांसाहार, चहा-कॉफी आणि परस्त्री गमन टाळलेच पाहिजे. लोकनाथ स्वामींना बसल्या बसल्या मांडी हलविण्याची सवय होती. याविषयी त्यांनी सांगितले, एकदा श्रील प्रभुपाद यांच्याशी चर्चा करताना जोरात ओरडून हे थांबव, असा आदेश दिला व नंतर मला जिलेबी आण असा आदेश दिला. यावरून वाईट गोष्टी करणे थांबव आणि चांगल्या गोष्टी कर असा श्रीलप्रभुपादांना सुचवायचे होते, असा अर्थ ेवून
ोकनाथ स्वामींनी इस्कॉनच्या प्रसार कार्यात स्वतःला असे काही झोकून दिले की आज ते देश-विदेशात कृष्णभक्तीचा प्रसार करीत आहेत. त्यांच्या कार्याला दंडवत प्रणाम.
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply