भांडुनी उपयोग नाही भांडुनी थकशील तूएकदा प्रेमात माझ्या जीवना पडशील तू
मी गुणांचा चाहता पण दोषसुध्दा सांगतोआरसा फेकून, माझा चेहरा धरशील तू
जाणले नाही जगा तू जाणले नाही मलाहे तुला समजेन तेव्हा केवढा रडशील तू
याच एका कारणाने चालतो आहे पुढेराग हा गेला तुझा की माफही करशील तू
वेगळे नाहीत आपण वेगळे होऊ कसे ?मी तिथे असणार आहे मी जिथे म्हणशील तू
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply