नवीन लेखन...

भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट



केन्द्रीय मनुष्यबल विकास मंत्री श्री कपिल सिब्बल यानी राज्यसभेत कबूल केले की देशात तब्बल १२ लाख शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत .ही अतिशय लाजीरवानी बाब आहे.आज देशाचे पंतप्रधान एकीकडे सांगतात की देशाचा आर्थिक विकासदर वाढला आहे आणि महागाई

दर घटला आहे.भारत हा जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे।

मात्र ज्या देशात शिक्षकाच्या १२ लाख जागा जर रिक्त असतील त्या देशाने जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न कशाच्या आधारावर पहावे?

ग्रामीण भागातही बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर आहे मात्र त्याना दिशा देणारे शिक्षण उपलब्ध नाही व जे उपलब्ध आहे ते इतके महागडे आहे की सामान्य माणसाच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर आहे।

एकीकडे आर्थिक विकास दर वाढीच्या चर्चा हॉट असतानाच दुसरीकडे कृषि प्रधान असलेल्या भारतात ख़त विकत घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेताकर्यावर शासनाचे नोकर असलेले पोलिस गोळ्या झाडतात,लाठीचार्ज करतात ही केवढी विसंगति आहे?स्वातंत्र्य मिळून आज सहा दशके होउन गेली आहेत परन्तु शेताकर्याना त्याना पाहिजे असलेले ख़त पुरविन्यास शासन असमर्थ ठरत आहे आणि तिकडे विकासदर वाढला आहे असे रोज वर्तमानपत्रात छापून येते।ज्या शेतकर्याच्या कश्तातुन,त्याने रक्त आटवून केलेल्या मेहनतिमुले देशाच्या राष्ट्रिय उत्पन्नात वाढ होतेत्याच्या नशिबी पोलिसांचा लाठीचार्ज,गोलीबार? ही कसली लोकशाही?ख़त दुकानदार वातानुकूलित केबिन मद्धे फिरत्या खुर्चीवर बसून संगणकावर गेम खेलत बसतो आणि इकडे बिचारा शेतकरी आपल्या सर्व कुटुम्बियाना घेवुन उन्हातान्हात रांगेत उभा कारण की प्रत्येकी एक पोते मिलणार असल्यामुले तर आपल्याला पाच पोते तरी मिलतिल ही आशा …किती ही कुचम्बना?

प्रमाणिकपणे मेहनत करुनसुद्धा tयाच्या नशिबी अशी हाल अपेश्ता जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही नसेल !

काय तर कृषिप्रधान देश!!!!!!!

वा रे लोकशाही………….. महादेव विश्वनाथ कापुसकरी

बसमथनगर जी.हिंगोली.मोब.९४२३१४१००८


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..