आज गावत मन मेरो झूम के या गाण्याबद्दल मी काय लिहू ? पं डी वी पलुस्कर आणि उस्ताद आमिर खाँ – दिग्गज गायक. हे गाणं म्हणजे बैजू आणि तानसेन ह्यांच्यातील जुगलबंदी!!! आणि ही जुगलबंदी बैजूने जिंकलेली दाखवायची.
या चित्रपटात संगीत नौशादसाहेबांचं आणि गाणं मोहम्मद रफ़ी आणि उस्ताद आमिर खाँ यांच्याकडून गाऊन घ्यायचं निश्चित झालं. बैजूनं तानसेनवर मात केलेली दाखवणे म्हणजे रफ़ीसाहेबांनी खाँसाहेबांवर मात केलेली दाखवणे हे रफ़ीसाहेबांना मान्य नव्हते. त्याला कारण म्हणजे खाँसाहेबांबद्द्ल मोहम्मद रफ़ी यांना असलेला आदर, आणि म्हणून त्यांनी हे गाणं गाण्यास नकार दिला. एखाद्याबद्द्ल आदर असणे म्हणजे काय याचं अप्रतिम उदाहरण!!
याच आदराचा मान ठेवत खाँसाहेबांनी पं पलुस्करांचं नाव सुचवलं, त्यांच्याकडून या गाण्यात हार पत्करण्यात खाँसाहेबांना आनंदच वाटला आणि ह्यातून श्वास रोखून धरणारी जुगलबंदी रसिकांसमोर आली.
गाणे : आज गावत मन मेरो झूम के
चित्रपट : बैजू बावरा
संगीतकार : नौशाद अली
गीतकार : शकील बदायुनी
गायक : पं डी वी पलुस्कर, उस्ताद आमिर खाँ
आज गावत मन मेरो
झूम के तोरी तान भगवान
आज गावत मन मेरो …
हार गया तो जीवन जावे
जीता गायक दुनिया पावे
रखियो अब मोरी शान रे
आज गावत मन मेरो …
प्रेम के कारण प्रेमी गावे
तानों से बादल पिघरावे
जगत में रहे मान रे
आज गावत मन मेरो …
सात सुरों के मधुर मिलन में
जादू आज जगा दें
बैजू के संगीत विधाता
जल में आग लगा दें
जल में आग लगा दें
आ~
आज गावत मन मेरो …
संग्राहक आणि संकलक:- प्रफुल्ल गायकवाड
Leave a Reply