नवीन लेखन...

भेंडीचा पिवळा रस्सा



असं म्हणतात की दर चार कोसावर बोलीभाषेत बदल होतो. माझं तर असं निरीक्षण आहे की, दर दहा कोसावर भाजीच्या रस्स्याची चव बदलत असते. अगदी प्रयोग पहायला हरकत नाही. या गावाहून दुसर्‍या गावाला गेलं की रस्सा म्हणजे ग्रेव्हीत बदल होतोच.याचं कारण म्हणजे वापरण्यात येणारे मसाले, फोडणी देण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे तयार करणारे हात यांच्यात सतत वेगळेपण असतं.आतापर्यंत अनेक भाजीचे रस्से आपण लाल, पांढरे, हिरवे पाहिले आहेत. परंतु पिवळ्या ग्रेव्हीची मजा काही औरच असते. परवा एका मित्राकडे जेवायला बोलावलं होतं. शुद्ध शाकाहारी बेत होता. समोर डिश आली आणि मी पहातच राहीलो. पिवळी ग्रेव्ही असणारी भेंडीची भाजी खातांना मस्तच वाटत होती. (भेंडी म्हटली म्हणजे जेवणात टिफीनचा डब्बा आठवतो.)जेवण करत असतांनाच पिवळी ग्रेव्हीची भेंडी कशी बनवतात याची माहिती घेतली.ग्रेव्हीसाठी साहित्य पुढील प्रमाणे- हिरवीगार कोवळी भेंडी सर्वसाधारणपणे पाव किलो (चार माणसे आरामात खाऊ शकतात), अर्धी वाटी आंबट दही, एक चमचा आल्याचा कीस, दोन हिरव्या मिरच्या, चवी पुरती साखर, जाडसर शेंगदाणा कुट दोन चमचे, एक चमचा कॉर्नफ्लोअर, फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, चवीसाठी थोडे मीठ. सर्वप्रथम भेंडी धुवून घ्यावी. देठ काढून भरलेली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचा कीस, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचा कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, कुट आणि अर्ध्यावाटीत पाणी घेऊन त्यात कॉनफ्लोअर टाकावा. हे साहित्य भेंडीवर घालावे. अर्धाचमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवावी. ऊकळी आल्यानंतर भेंडीसह यलो ग्रेव्ही काढावे. सजावटी साठी नारळ चव, हिरवी कोथिंबीर घालावी. साध्या

भाता बरोबर यलो ग्रेव्ही उत्

म लागते.विशेषत: नेहमीचे वरण, आमटी खाऊन कंटाळलेल्यांना यलो

ग्रेव्हीची चव निश्चितच आवडेल.ग्रेव्ही म्हणजे रस्सा जसा असेल तशी चव रंगतदार होत जाते. रस्स्याशिवाय जेवण पूर्ण होतच नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भात तर रस्सेदार भाजी असल्याशिवाय जेवण झाल्याचे समाधान मिळतच नाही.(सौजन्यः महान्यूज)

— बावर्ची

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..